
श्रीगोंदा:- दि. १७ रोजी शासकीय विश्रामगृह श्रीगोंदा येथे बहुजन क्रांती सेना महाराष्ट्र राज्य प्रमुख कार्यकर्त्यांची बैठक पार पडली. यावेळी बहुजन क्रांती सेना अल्पसंख्याक आघाडी तालुका उपाध्यक्ष पदी सलीम इनामदार यांची नेमणूक करण्यात आली. सलीम इनामदार यांना संस्थापक अध्यक्ष वामनभाऊ भदे, राजु कोथिंबिरे, शिवाजी राऊत, संजय सांगळे यांच्या हस्ते नियुक्ती पत्र देणेत आले.
यावेळी बोलताना सलीम इनामदार यांनी सांगितले की संघटना वाढीसाठी तसेच अल्पसंख्याक वर्ग हा शासकीय योजनांपासून दूर आहे किंवा त्यासाठी लागणाऱ्या कागदपत्र पूर्ततेसाठी जास्त वेळ जात आहे यासाठी आपण विशेष मोहीम राबवणार असून अल्पसंख्याक वर्ग हा एका छताखाली आला पाहिजे यासाठी संघटनेमार्फत प्रयत्न करणार आहोत.
यावेळी संस्थापक अध्यक्ष श्री.वामनभाऊ भदे, श्री.राजू अण्णा कोथिंबिरे, श्री.संजय सांगळे, श्री शिवाजी राऊत, श्री.साहेबराव रासकर,श्री.सावता हिरवे,श्री.सचिन कोरटकर,श्री.सागर दरोडे, बहुजन क्रांती सेना प्रसिद्धी प्रमुख महाराष्ट राज्य श्री. सुरेश म्हेत्रे तसेच बहुजन क्रांती सेनेचे कार्यकर्ते व पदाधिकारी उपस्थित होते.
