

महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान उमेद व महात्मा फुले महिला ग्रामसंघ शेडगाव यांच्या यांच्या संयुक्त विद्यमाने महिला दीन साजरा करण्यात आला. यावेळी प्रमुख उपस्थिती उमेद अभियानाचे प्रभाग समन्वयक ऋषिकेश रधवे, विस्ताराधिकारी पंचायत समिती श्रीगोंदा सारिका हराळ, कृषी सहायक सचिन गोडसे, शेडगाव स्टेट बँक मॅनेजर ठुबे, पशु वैद्यकीय अधिकारी अश्विनी गायकवाड, महिला उद्योजिका सुषमा चौधुले, घुगल वडगाव येथील कृषी सखी अदिती कदम, सीआरपी अर्चना वाळुंज, शोभा येरकल, दिपाली निंबाळकर पशुसखी हेमलता भुजबळ,सीआरपी प्रज्ञा कुलकर्णी व प्रभाग संघाचे अध्यक्ष आम्रपाली धेडे उपस्थित होते. यावेळी बोलताना सारिका हराळ यांनी महिलांनी बचत गटाच्या माध्यमातून प्रगती करून उंच भरारी घ्यावी असे प्रतिपादन केले. कृषीअधिकारी सचिन गोडसे यांनी बचत गट व कृषी योजना याबदल उपस्थितांना सविस्तर मार्गदर्शन केले. छोट्या नाटिकेच्या माध्यमातून सेंद्रिय शेती व सेंद्रिय शेती मधून प्रगती कशी करता येऊ शकते याबदल सुनीता गोरे व शुभांगी म्हस्के उपस्थितांना सविस्तर मार्गदर्शन केले. या कार्यक्रमाचे आयोजन महात्मा फुले महिला ग्रामसंघ शेडगाव व शेडगाव येथील बचत गटातील महिला यांनी केले होते आभार शुभांगी म्हस्के यांनी मानले.


