

श्रीगोंदा : नागवडे इंग्लिश मिडीयम स्कूल श्रीगोंदा येथे ७९ वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा करण्यात आला यावेळी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना अनुराधाताई नागवडे यांनी विद्यार्थ्यांना अनेक उदाहरणे देत देशभक्ती तसेच देशप्रेम याबदल माहिती दिली. ऑपरेशन सिंदूर , स्वातंत्र काळातील घडामोडी याबदल विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. नागवडे इंग्लिश मिडीयम च्या विद्यार्थ्यांच्या रूपाने भारताचे तसेच श्रीगोंद्याचे भविष्य घडत आहे असे प्रतिपादन केले. विद्यार्थ्यांनी सादर केलेल्या महाराष्ट्र व सिक्कीमचे लोकनृत्याने उपस्थितांची मने जिंकली. कराटे प्रात्यक्षिक, डंबेल नृत्य, देशभक्तीपर गीतांवरती नृत्य सादरीकरण केले. यावेळी स्वातंत्र्यवीरांच्या वेशभूषेतील विद्यार्थांनी सर्वांचे लक्ष वेधले. विद्यार्थ्यांना खाऊचे वाटप करून कार्यक्रमाची सांगता झाली. यावेळी तुळजाभवानी सेवा प्रतिष्ठान चे निरीक्षक एस. पी. गोलांडे, मुख्याध्यापिका नीतू दुलानी, सोनिया गांधी पॉलिटेक्निक चे प्राचार्य अमोल नागवडे, लॉ कॉलेज प्राचार्य चोभे मॅडम,सतीश मखरे, प्रशांत गोरे, सोनाली जामदार, रेखाताई लकडे , कविता भोस , स्नेहल बगाडे, अँड. सुनील भोस , पत्रकार पीटर रणसिंग विद्यार्थी, पालक, शिक्षक , शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते. सूत्रसंचालन प्रा. प्रियंका नागवडे, प्रा. जयेश आनंदकर यांनी केले तर आभार प्रा. नदाफ सय्यद यांनी मानले.


