

महिला पालकांचा उस्फुर्त प्रतिसाद l बक्षिसांची लयलूट
तुळजाभवानी सेवा प्रतिष्ठान संचलित शिवाजीराव नागवडे डॅफोडील्स स्कूल व कौशल्यादेवी नागवडे इंग्लिश मिडीयम स्कूल श्रीगोंदा यांच्या संयुक्त विद्यमाने महिलांसाठी श्रावण मासारंभाचे निमित्त साधून नागपंचमी सणाच्या निमित्ताने महिला पालकांसाठी पाककला, रांगोळी, मेहंदी, वेशभूषा, टाकाऊ पासून टिकाऊ वस्तू तयार करणे, पूजेचे ताट सजावट, कापसापासून सुंदर हार-माली तयार करणे यासह बलून गेम, संगीत खुर्ची यासह विविध क्रीडा स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते. सुंदर सजावट केलेला झोका कार्यक्रमाचे खास आकर्षण ठरले. महिला पालकांनी झोका खेळण्याचा मनमुरादआनंद लुटला.
कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान अहिल्यानगर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या संचालिका अनुराधाताई नागवडे यांनी भूषविले.
कोणत्याही स्पर्धेमध्ये हार-जीत हि असतेच, ज्याप्रमाणे उंच झोका घेण्यासाठी तो अगोदर मागे घ्यावा लागतो, याप्रमाणेच जीवनामध्ये यश अपयश येतच असते किंवा वेळप्रसंगी दोन पावले मागे यावे लागते. मात्र त्याने खचून न जाता पुन्हा उभारी घेण्याची प्रेरणा मिळते. महिला पालकांच्या कला गुणांना वाव मिळावा यासाठी अश्या विविध स्पर्धा आपण दरवर्षी आयोजित करत असल्याचे अनुराधा नागवडे यांनी स्पष्ट केले.
यावेळी परीक्षक म्हणून पाककला स्पर्धा पूनम फिरोदिया, पल्लवी सिद्ध रांगोळी, शोभा गायकवाड, प्रियांका लगड मेहंदी, शबा शेख, वेशभूषा स्नेहल बगाडे, प्रियांका वाघमारे, विद्या गुंदेचा यांनी परीक्षक म्हणून काम पहिले. यावेळी स्त्रीरोगआरोग्य तपासणी शिबीर आयोजित करण्यात आले होते. यासाठी डॉ. प्रीती म्हस्के आणि टीम उपस्थित होते. यावेळी महिलांना स्त्रीरोग व त्यावर उपाय याबद्दल डॉ. प्रीती म्हस्के यांनी मार्गदर्शन केले. यावेळी सर्व पालकांच्या वतीने छाया भापकर यांनी आपले मनोगत व्यक्त करत नाविन्यपूर्ण उपक्रम राबविल्याबद्द् शालेय प्रशासनाचे आभार मानले.कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी तुळजाभवानी सेवा प्रतिष्ठानचे निरीक्षक एस.पी.गोलांडे, मुख्याध्यापिका नीतू दुलानी, यांच्यासह शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी परिश्रम घेतले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन जयेश आनंदकर यांनी प्रियंका नागवडे यांनी प्रास्ताविक केले तर आभार प्रा. राहुल भांडवलकर यांनी मानले.
स्पर्धेनुसार अनुक्रमे प्रथम तीन क्रमांक
पाककला – स्वाती इंगळे, रूपाली शिंदे, शितल गलांडे, छाया भापकर संयुक्त तृतीय
रांगोळी – भक्ती भोंग, कल्पना होले व किरण फडके संयुक्त, पूजा लोखंडे
मेहंदी – वेणू सुपेकर, खुशी काझी, रुबाना सय्यद
वेशभूषा – ऋतुजा मांडे, नीता चव्हाण, विजया कोरे
पूजेचे ताट सजावट – विजया कोरे, शितल ढवळे, प्रियंका काळे कापसापासून हार तयार करणे – पायल पवार
गायन स्पर्धा – स्नेहल रोडे, प्रतीक्षा तोरडमल, स्वाती गावडे
टाकाऊ पासून टिकाऊ वस्तू तयार करणे – शुभांगी कदम, सरोज बगाडे
मनोरंजनात्मक खेळ – आकांक्षा गलांडे, वैष्णवी मोटे, शर्वरी गोलांडे
