कार्याध्यक्ष समीर भुजबळ यांच्या प्रमुख उपस्थितीत सासवड शासकीय विश्रामगृह येथे समता परिषदेची आढावा बैठक
पुणे,सासवड,दि.२५ जुलै:- अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषदेचे राष्ट्रीय अध्यक्ष मंत्री छगन भुजबळ यांच्या सूचनेनुसार संघटनेचे संघटन अधिक मजबूत करण्यासाठी कार्याध्यक्ष तथा माजी खासदार समीर भुजबळ हे राज्यभर दौरा करत पदाधिकाऱ्यांच्या जिल्हानिहाय आढावा बैठक घेत आहे. त्यानिमित्ताने मंगळवार दि.२९ जुलै २०२५ रोजी सासवड शासकीय विश्रामगृह येथे सकाळी ९ वाजता त्यांच्या प्रमुख उपस्थितीत पुणे ग्रामीण पूर्व विभागाची बैठक पार पडणार आहे. या बैठकीस समता सैनिकांनी बहुसंख्येने उपस्थित राहावे असे आवाहन अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषदेच्या वतीने करण्यात आले आहे.अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषदेच्या कार्याध्यक्ष पदाची सूत्रे हाती घेतल्यानंतर संघटन अधिक मजबूत करण्यासाठी माजी खासदार समीर भुजबळ हे महाराष्ट्रभर दौरा करत असून जिल्हानिहाय आढावा बैठका घेत आहे. नुकताच त्यांनी उत्तर महाराष्ट्र, मराठवाडा, विदर्भ, पश्चिम महाराष्ट्रात जिल्हा निहाय आढावा बैठका घेऊन नवीन नियुक्त्या तसेच संघटनेच्या पुढील वाटचालीबाबत पदाधिकाऱ्यांशी संवाद साधत त्यांना संघटन अधिक मजबूत करण्यासाठी सूचना केल्या आहे. त्यांच्या या बैठकांना अतिशय चांगला प्रतिसाद देखील लाभत आहे. मंगळवार दि.२९ जुलै २०२५ रोजी ते सासवड शासकीय विश्रामगृह येथे पुणे जिल्ह्यातील पूर्व विभागाचा आढावा घेणार आहे.या बैठकीस समता सैनिकांनी बहुसंख्येने उपस्थित राहावे असे आवाहन अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषदेच्या वतीने करण्यात आले आहे.

