
अहिल्यानगर प्रतिनिधि : पुणे येथील एक्सलंट ऑलिंपियाड फाउंडेशन यांच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या राज्यस्तरीय एक्सलंट ऑलिंपियाड परीक्षा २०२५ तसेच अहिल्यानगर येथे पार पडलेल्या राज्यस्तरीय अबॅकस स्पर्धेमध्ये तुळजाभवानी सेवा प्रतिष्ठान संचलित शिवाजीराव नागवडे डॅफोडील्स स्कूलच्या विद्यार्थ्यांनी सहभाग घेत घवघवीत यश संपादन केले.
ऑलिंपियाड स्पर्धेचा निकाल पुढीलप्रमाणे
प्रसन्ना गोलांडे व अवंती पवार – संयुक्तरीत्या राज्यात प्रथम
मनस्वी साखरे व विराट नागवडे – राज्यात संयुक्तरित्या द्वितीय
स्वराज कोथिंबीरे – केंद्रात प्रथम
शिवाज्ञा नागवडे – केंद्रात द्वितीय
अबॅकस स्पर्धेचा निकाल पुढीलप्रमाणे –
आर्वी आढाव – तृतीय क्रमांक, शिवम खोमणे – द्वितीय क्रमांक, विराज लोखंडे – तृतीय तसेच राजनंदिनी भोसले हीने चॅम्पियन किताब पटकावला.
अबॅकस स्पर्धेतील उत्तेजनार्थ बक्षिसे मिळवणारे विद्यार्थी – ज्ञानेश्वरी जामदार, मनस्वी साखरे, अक्षदा खराडे, ओम कोठारे, महारुद्र कन्हेरे, पियुष गायकवाड, प्रणव नवले, विघ्नेश चव्हाण, सानवी दरेकर, आराध्या गवळी, तनिष्का बोरुडे, आयुष दरेकर, ज्योतिरादित्य जामदार, रुद्र बगाडे, प्रथमेश कोथिंबीरे.
सर्व गुणवंत विद्यार्थ्यांचे तसेच मार्गदर्शक हेमलता काळाने व अश्विनी मचे यांचे तुळजाभवानी सेवा प्रतिष्ठानचे निरीक्षक एस पी गोलांडे, सोनिया गांधी पॉलिटेक्निक कॉलेजचे प्राचार्य अमोल नागवडे, विद्यालयाच्या मुख्याध्यापिका नीतू दुलानी यांनी विद्यालयाच्या वतीने सत्कार करून अभिनंदन केले.
तुळजाभवानी सेवा प्रतिष्ठानचे अध्यक्ष राजेंद्र दादा नागवडे, विश्वस्त अनुराधाताई नागवडे, यांच्यासह शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी यशस्वितांचे अभिनंदन केले आहे.
