


पुणे/प्रतिनिधी
मुंबई येथे नुकत्याच पार पडलेल्या अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषदेच्या राज्य कार्यकारिणीच्या महत्वपूर्ण बैठकीत, मा. श्री. छगन भुजबळ साहेब ( संस्थापक अध्यक्ष, समता परिषद) यांच्या अध्यक्षतेखाली, पुणे जिल्हा च्या सरचिटणीस पदी अनिकेत भागवत यांची व दौंड तालुका उपाध्यक्ष पदी प्रविण होले व दौड तालुका सरचिटणीस पदी पांडुरंग शिंदे यांची निवड करण्यात आली.
या बैठकीत श्री.अनिकेत भागवत ,श्री.प्रविण होले, मा.पांडुरंग शिंदे यांची एकमताने अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषद – पुणे जिल्हाच्या सरचिटणीस पदी दौंड तालुका उपाध्यक्ष पदी, दौंड तालुका सरचिटणीस पदी निवड करण्यात आली. त्यांच्या सामाजिक कार्याचा आणि समतावादी मूल्यांचा अभ्यासपूर्वक विचार करून हा निर्णय घेण्यात आला.
समता परिषदेच्या ध्येयधोरणांचा प्रचार आणि प्रसार अधिक गतीने करण्यासाठी, वंचित, शोषित, मागास आणि दुर्लक्षित घटकांच्या हक्कासाठी लढण्यासाठी ही नियुक्ती अत्यंत महत्त्वाची ठरणार आहे.
ही निवड समता परिषदेच्या संघटनात्मक मजबुतीचा एक भाग असून, पुढील काळात परिषदेला अधिक सक्रिय, सशक्त आणि जनसामान्यांशी जोडणारे कार्य करण्यासाठी नव्या नेतृत्वाची भूमिका महत्वाची असेल.
अखिल भारतीय महात्मा फुले च्या वतीने अभिनंदन करण्यात आले. या राज्य कार्यकारिणी बैठकीला खासदार समीरजी भुजबळ, आमदार पंकज भुजबळ, कार्याध्यक्ष बापूसाहेब भुजबळ, महाराष्ट्र महिला प्रदेशाध्यक्ष मंजिरीताई घाडगे, प्रदेश सरचिटणीस स्नेहाताई सोनकाटे महाराष्ट्र , महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष आबांदास गारुडकर,विभागीय अध्यक्ष प्रितेश गवळी, विभागीय संघटक सोमनाथ भुजबळ शहराध्यक्ष पंढरीनाथ बनकर,जिल्हाध्यक्ष अनिल लडकत,जिल्हा उपाध्यक्ष रोहिदास कुदळे ,जिल्हा प्रसिद्धी प्रमुख किशोरभाऊ वचकल, दौंड तालुका अध्यक्ष विजय गिरमे, बारामती तालुका अध्यक्ष तुषार हिरवे यांच्यासह अनेक पदाधिकारी उपस्थिती होते.
