
सोपान सासवडे ग्रामीण प्रतिनिधी अहिल्यानगर.
केंद्रीय कृषिमंत्री माननीय श्री शिवराज सिंग चव्हाण यांच्या संकल्पनेतून विकसित कृषी संकल्प अभियान कार्यक्रम 4 जून 2025 रोजी अहिल्यानगर तालुका येथील निंबळक , इसलक, खारे कर्जुने व नांदगाव या गावांमध्ये संपन्न झाला. शेतकऱ्यांना तूर मूग उडीद या पिकाविषयी मार्गदर्शन करण्यात आले तसेच दूध उत्पादक शेतकऱ्यांना मुक्त गोठा व जनावरातील रोग निर्मूलन विषयी सविस्तर मार्गदर्शन करण्यात आले. यावेळी कृषी विज्ञान केंद्र दहिगाव ने येथील श्री नारायण निंबे (कृषी विद्या), सचिन बडदे (कृषी विस्तार), डॉ.चंद्रशेखर गवळी (पशुविज्ञान), प्रकाश बहिरट (कार्यक्रम सहाय्यक प्रयोगशाळा) तसेच जेऊरचे मंडळ कृषी अधिकारी श्रीमती घोरपडे मॅडम ,कृषी पर्यवेक्षक श्री विजय सोमवंशी, कृषी सहाय्यक चैतन्य बडवे व आत्माचे सहाय्यक तंत्र व्यवस्थापन श्री उमेश डोईफोडे उपस्थित होते. पंचक्रोशीतील शेतकऱ्यांनी उपस्थित राहून तज्ञांचे मार्गदर्शन घेतले.
