दौंड प्रतिनिधि : राशिन ता. कर्जत, जि. अहिल्यानगर येथे शनिवार दि. ०२ रोजी मराठा समाजातील काही युवकांनी महात्मा फुले चौकातील नामफलकांची तोडफोड करत, जातीवाचक शिवीगाळ करत, सदर फलक त्याभोवताली बांधण्यात आलेल्या व बांधकाम चालु असलेली वास्तु पडली. समाजातील वीर ता.पुरदंर जि.पुणे या गावातील तरुणाला काही जातीवाद्यांनी अमानुषपणे मारहाण करून जातीवाचक शिवीगाळ केल्या प्रकरणी निषेध म्हणून तसेच दोषींवर कार्यवाही करावी अशा आशयाचे पत्र तहसीलदार दौंड यांना देणेत आले.
या सदर कृतीमुळे महाराष्ट्रातील सर्वच फुले वैचारिक अनुयायी, फुले, शाहू, आंबेडकर विचारसरणीला माननारे ओबीसी, बहुजन समाज बांधव यांच्या भावना दुखावल्या गेल्या आहेत. सदर आरोपी यांच्या वरती कठोर कारवाई करण्यात यावी व अटक करण्यात यावी असे न घडल्यास संविधानिक पध्दतीने दौंड तालुका बंद व उपोषण करण्यात येईल. असे या पत्रात नमूद करण्यात आले आहे. या वेळी सकल ओबीसी समाज, दौंड तालुका,अ.भा. महात्मा फुले समता परिषद दौंड तालुका, फुले, शाहु, आंबेडकर विचारमंच दौंड तालुका,ओबीसी पर्व बहुजन सर्व, दौंड तालुका या संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी निवेदन दिले.
यावेळी श्री.विजय गिरमे दौंड तालुका अध्यक्ष समता परिषद,प्रविण होले उपाध्यक्ष समता परिषद,श्री.अनिकेत भागवत सरचिटणीस समता परिषद,श्री.किशोर भाऊ वचकल जिल्हा प्रसिद्धी प्रमुख समता परिषद, किशोर मारुती भागवत, सुर्यकांत भागवत, अनिकेत वि.भागवत, प्रशांत रुपनवर, रामचंद्र भागवत, विकास होले, ओबीसी नेते किशोर हिगंणे, संतोष नेवसे, संदिप लडकत, वैभव झगडे,अमोल भागवत,आदी उपस्थित होते.

