
विजयकुमार गायकवाड
तालुका प्रतिनिधी
भिगवण : पुणे व सोलापूर या दोन जिल्ह्याला जोडणाऱ्या भिमा नदीवरील कोंढार चिंचोली ते डिकसळ पुलाचे काम येत्या एक-दोन दिवसात युद्ध पातळी सुरू होणार असल्याची माहिती कोंढार चिंचोलीचे मा. सरपंच देविदास साळुंखे यांनी दिली या पुलासाठी 55 कोटी रुपयांचा निधी मंजूर असून गेल्या वर्षी या कामाला प्रत्यक्षात सुरुवात करण्यात आली होती परंतु उजनीचे पाणी पातळी वाढल्याने हे काम बंद करण्यात आलू होते या कामाची मुदत तीन वर्षाची आहे.सदर काम युद्धपातळीवर चालु करणेसाठी कोंढार चिंचोलीचे मा. सरपंच देविदास साळुंके यांनी कामाचे ठेकेदार राहुल पटेल पुणे यांच्याशी पाठपुरावा केला असल्याचे सांगितले. पटेल यांनी सदर पुलाचे काम एक-दोन दिवसात चालू करण्याचे आश्वासन दिले असुन पुलाचे सर्व कॉलम जुन,जुलैच्या आत युध्दपातळीवर पाणी पातळीच्यावर काढून शासनाची मदत घेऊन पुढील लॉचीगचे काम जादाची यंत्रना वापरुन वेगात करणार असल्याचे साळुंके यांना फोनवरुन सांगितले असल्याचे साळुंखे यांनी सांगितले. या कामाचे श्रेय घेण्यासाठी राजकीय पक्षाच्या पुढार्यांची चढाओढ लागल्याचे चित्र दिसून येत आहे. सर्वसामान्य नागरिकांनकडुन मात्र हे काम जलद गतीने सुरू करण्याची मागणी होत आहे.
