सोपान सासवडे
जिल्हा ग्रामीण प्रतिनिधी अहिल्यानगर.
शेवगाव तालुक्यातील ढोरजळगाव येथील रहिवासी राहुल बाळासाहेब फसले यांची एम पी एस सी मार्फत घेण्यात येणाऱ्या परीक्षेद्वारे सहाय्यक प्रादेशिक परिवहन अधिकारी वर्ग एक पदी निवड झाली आहे.
राहुल यांचे प्राथमिक शिक्षण ढोरजळगाव येथे तर महाविद्यालयीन शिक्षण भेंडे येथील जिजामाता महाविद्यालयात झाले. राहुल यांनी मेकॅनिकल इंजिनिअरिंगची पदवी घेऊन क्लास वन अधिकारी होण्याचे स्वप्न उराशी बाळगून स्पर्धा परीक्षेच्या अभ्यासाला सुरुवात केली. सलग दोन वर्ष आलेल्या अपयशाला खचून न जाता अभ्यासात सातत्य ठेवले व सहाय्यक कक्ष अधिकारी मंत्रालयात निवड झाली. एवढ्यावरही समाधान न मानता पुन्हा अभ्यासात सातत्य ठेवून आरटीओ वर्ग एक अधिकारी हे पद राहुल यांनी संपादन केलं. जिजामाता महाविद्यालयाचे ग्रंथपाल बाळासाहेब फसले यांचे ते चिरंजीव होत. राहुल यांच्या निवडीबद्दल पंचक्रोशीत आनंद उत्सव साजरा करण्यात आला. फटाक्याच्या आतषबाजीने व ढोल ताशाच्या गजराने त्यांची गावात जंगी मिरवणूक काढण्यात आली.