
पुणे प्रतिनिधि :- ओबीसींचे आश्वासक नेतृत्व आणि मार्गदर्शक छगन भुजबळ यांची महाराष्ट्र राज्य कॅबिनेट मंत्रीपदी निवड होणे म्हणजे ओबीसी नेतृत्वाचा योग्य सन्मान असल्याच्या भावना समता परिषदेच्या कार्यकर्त्यांनी आज व्यक्त करीत आंनदोत्सव साजरा केला. भुजबळ यांना उशीराने का होईना राज्य सरकारने त्यांचातील नेतृत्व गुण हेरूनदिलेल्या संधी बद्दल गंज पेठेतील महात्मा फुले स्मारक समता भूमी येथे अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषदेतर्फे पेढे वाटून आनंदोत्सव साजरा करण्यात आला. यावेळी महात्मा फुले यांना पुष्पहार अर्पण करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली. या प्रसंगी महाराष्ट्र प्रदेश अध्यक्षा मंजिरीताई घाडगे, प्रदेश सरचिटणीस स्नेहाताई सोनकाटे,विभागीय अध्यक्ष प्रीतेशजी गवळी,अविनाश चवरे,पुणे शहराध्यक्ष पंढरीनाथ बनकर, पुणे शहर अध्यक्षा वैष्णवी सातव,शिवराम बापू जांभुळकर,सल्लागार प्राध्यापक गौतम बेंगाले, जिल्हा प्रसिद्धी प्रमुख श्री.किशोरभाऊ वचकल, ओबीसी नेते मृणाल ढोले पाटील,शारदाताई लडकत, प्रकल्प ताम्हणे, रवी लडकत, सागर दरवडे, अविनाश चौरे, प्रदिपजी बनसोडे,बंडु शेठ कचरे, संतोष गिरमे, महेश बनकर आदी मान्यवरांसह अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषदेचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.


ज्य़ेष्ठ नेते छगन भुजबळ यांची राज्याच्या कॅबिनेट मंत्रीपदी निवड झाल्याबद्दल गंज पेठेतील महात्मा फुले स्मारक समता भूमी येथे अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषदेतर्फे पेढे वाटून आनंदोत्सव साजरा करण्यात आला.
