

डिकसळ येथील अखंड हरिनाम सप्ताह.
भिगवण : डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांनी मिळवून दिलेला मतदानाच्या हक्काचा उपयोग निर्भीडपणे योग्य उमेदवार निवडून देण्यासाठी करा. आपले पवित्र मत विकू नका मत विकणे व मत विकत घेणे हे जगातील सर्वात मोठे पाप आहे. अशा प्रकारचे समाज प्रबोधनपर विचार ह.भ. प. संतोष महाराज देवकाते यांनी इंदापूर तालुक्यातील डिकसळ येथील गेले ३५ वर्षे चालू असलेल्या अखंड हरिनाम सप्ताहच्या सोमवार( ता.१८) रोजी कीर्तन रुपी सेवेतुन व्यक्त केले. पुढे बोलताना त्यांनी सांगितले की, ते दिवसेंदिवस माणसाच्या ज्ञानावर शेवाळ येत असुन ते शेवाळ पुन्हा न येण्यासाठी अध्यात्मिक व परमात्मिक ज्ञानाची गरज आहे. अलीकडच्या काळात संप्रदायाच्या नावाखाली काही लोक अमाप पैसे मिळवत असुन काही कीर्तनकार एका दिवसात चार कीर्तन सेवा करून पैसा कमवत आहे. सकस आहार करणे काळाची गरज असून औषधाची फवारणी करून कमी वेळेत पिकवलेल्या भाजीपाल्यामुळे माणूस रोगी होत आहे. शरीर हीच माणसाची मोठी संपत्ती असून ती सदृढ ठेवण्यासाठी व्यायामाबरोबरच
गावरान भाजीपाला व कडधान्याची सेवन करणे गरज आहे. या कीर्तनास गावातील युवकांसह ज्येष्ठ नागरिक व महिला मोठ्या संख्येने उपस्थित होते. सदर कीर्तन रुपी सेवेला बाळासो व पांडुरंग महादेव भादेकर यांनी किर्तन सौजन्य दिले होते.
