
सोपान सासवडे : जिल्हा ग्रामीण प्रतिनिधी अहिल्यानगर.
अहिल्यानगर येथील नगर तालुका कृषी कार्यालयात कार्यरत असलेले आत्मा अंतर्गत सहाय्यक तंत्रज्ञान व्यवस्थापक श्री उमेश बबनराव डोईफोडे यांना कृषी विभाग उत्कृष्ट कर्मचारी पुरस्कार प्रदान करण्यात आला. हा पुरस्कार जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी श्री सुधाकर बोराळे साहेब यांच्या हस्ते 15 ऑगस्ट 2025 रोजी जिल्हा कृषी अधिकारी कार्यालय अहिल्यानगर येथे देण्यात आला.
उमेश डोईफोडे यांनी आत्मा अंतर्गत नगर तालुक्यात 825 शेतकरी गटांची विक्रमी नोंदणी केली. तसेच आत्मा ,स्मार्ट ,पंजाबराव देशमुख नैसर्गिक शेती मिशन ,राष्ट्रीय नैसर्गिक शेती मिशन , तसेच नगर तालुक्यातील शेतकऱ्यांना शेळीपालन, कुक्कुटपालन, मधुमक्षिकापालन ,त्याचबरोबर कृषी प्रक्रिया उद्योगाचे मार्गदर्शन केले.या विविध योजनांचे उल्लेखनीय काम केल्याबद्दल त्यांना हा पुरस्कार देण्यात आला. याप्रसंगी विविध अधिकारी व मान्यवर उपस्थित होते.
