
अहमदनगर प्रतिनिधि
सध्याचे युग हे आर्टिफिशियल इंटेलिजन्स चे युग आहे.
बदलत्या काळानुसार विविध क्षेत्रात आर्टिफिशियल इंटेलिजन्स चा वापर होत आहे. शैक्षणिक, सामाजिक, राजकीय क्षेत्रात आर्टिफिशियल इंटेलिजन्स म्हणजेच कृत्रिम बुद्धिमतेचा वापर केला जातो. असाच प्रयोग शेतीमध्ये पीक व्यवस्थापन, पाणी व्यवस्थापन, खत व्यवस्थापन करण्यासाठी तसेच शेतामध्ये उत्पादन वाढीत आमूलाग्र बदल घडवण्यासाठी केला जातो, असाच एक प्रयोग कर्जत तालुक्यातील दुधोडी गावातील प्रगतशील शेतकरी श्री. बाळासाहेब कोऱ्हाळे यांच्या फुले -13007 या ऊस शेतामध्ये आर्टिफिशियल इंटेलिजन्स म्हणजेच कृत्रिम बुद्धिमतेचा वापर बारामती ॲग्रो यांच्या मार्फत करून कमी खर्चात ऊस लागवड त्याबरोबर उत्पादन वाढ कशी करता येईल तसेच शेतीला पूरक खत व्यवस्थापन, पाणी व्यवस्थापन कसे करता येईल यासाठी कृत्रिम बुद्धिमतेचा वापर करण्यासाठी लागणारी सामग्री बसविण्यात आली.
यावेळी माध्यमांशी बोलताना श्री. बाळासाहेब कोऱ्हाळे यांनी सांगितले की ऊस उत्पादक शेतकऱ्यांना मदत करून विविध तंत्रज्ञान आत्मसात करून उत्पादन वाढवणे हे बारामती ॲग्रो च्या माध्यमातून पूर्ण होत आहे. यामध्ये शेतीला खत, पाणी किती प्रमाणात द्यावे लागणार हे तंत्रज्ञान आपणास सूचित करते. पिकावर कोणत्या रोगाचा प्रादुर्भाव होणार आहे त्यापासून कसे संरक्षण करता येईल याबदल देखील माहिती दिली जाते. यावेळी त्यांनी बारामती ॲग्रो चे आभार मानले.
