
सर्वात कमी वयाच्या उमेदवाराचा उपराष्ट्रपती पदासाठी अर्ज.
दिल्लीत उपराष्ट्रपती पदासाठी शेतकरीपुञ उमेश म्हेञे यांचा उमेदवारी अर्ज दाखल.
उपराष्ट्रपती पदासाठी निवडणूक होत आहे, त्यासाठी उमेदवारी अर्ज भरणेसाठी आज शेवटचा दिवस. या निवडणुकीत शेतकरी कष्टकरी यांना देखील संधी मिळावी या उद्देशाने महाराष्ट्र लोक काँग्रेस संस्थापक अध्यक्ष उमेशभैय्या महादेव म्हेञे यांनी उमेदवारी अर्ज जमा केला. यावेळी बोलताना उमेशभैय्या महादेव म्हेञे यांनी सांगितले की उमेदवारी अर्ज दाखल करण्यामागील कारण म्हणजे मी उमेश म्हेञे महाराष्ट्र राज्य पुणे जिल्ह्याच्या दौंड तालुक्यातील एका सामान्य शेतकऱ्याचा मुलगा आहे. राजकारणी राष्ट्रीय पक्षातील लोक पैसे वाल्याला उमेदवारी अर्ज दाखल करण्यास लावतात मग मी शेतकऱ्याचा मुलगा -सामान्य कुटुंबातील नागरिक का अर्ज करू नये संविधानाने दिलेल्या अधिकारानुसार संविधानिक पद्धतीने आज उमेदवारी अर्ज जमा केला. उमेदवारी अर्जासाठी लागणारी सर्व कागदपत्रे जमा करण्यासाठी एक महिना इतका अवधी लागला व आज अर्ज दाखल करताना त्यासोबत सर्व कागदपत्र जोडून दिली आहेत. तरी या उपराष्ट्रपती पदासाठी मला मतदान करावे व गरीब, कष्टकरी, शेतकरी , शेतमजूर यांची सेवा करण्याची संधी द्यावी असे आवाहन त्यांनी केले.
