
श्रीगोंदा: महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियाना अंतर्गत पंचायत समिती श्रीगोंदा आणि सेंट ग्रामीण स्वयंरोजगार प्रशिक्षण संस्था अहिल्यानगर यांच्या संयुक्त विद्यमानाने आयोजित उमेद समूहातील गरजू महिलांना ३१ दिवसाचे शेळीपालन व्यवसाय व्यवस्थापन हे प्रशिक्षण देण्यात आले.
श्रीगोंदा तालुक्यातील शेडगाव येथील स्वयंसहायता समूहातील ३५ महिलांना व्यवसायास चालना मिळण्यासाठी उमेद अभियाना अंतर्गत जिल्हा अभियान व्यवस्थापक आदरणीय जगताप सर श्रीगोंदा पंचायत समितीच्या गटविकास अधिकारी राणी फराटे मॅडम यांच्या मार्गदर्शनाखाली सेंट ग्रामीण स्वयंरोजगार प्रशिक्षण संस्थे मार्फत गाव पातळीवर शेळीपालन प्रशिक्षण देण्यात आले. या प्रशिक्षणासाठी श्रीगोंदा पंचायत समितीमध्ये कार्यरत असलेल्या विस्तार अधिकारी सारिका हराळ मॅडम, तालुका अभियान व्यवस्थापक निलेश वाघ सर, तालुका व्यवस्थापक राहुल अडागळे सर, प्रभाग समन्वयक ऋषिकेश रंधवे सर तसेच सेंट ग्रामीण स्वयंरोजगार प्रशिक्षण संस्थेचे संचालक आदरणीय जी. देशमुख सर, पर्यवेक्षक विशाल वांढेकर सर व ‘ अ ‘ वर्ग प्रशिक्षक महेश्वर गुंड सरांनी हे प्रशिक्षण खुप छान रीतीने पार पाडण्यासाठी विशेष सहकार्य केले.
शेळीपालन प्रशिक्षणात ’अ ’ वर्ग प्रशिक्षक महेश्वर गुंड सर यांनी महिलांना समजेल अशा भाषेत व उदाहरणे देऊन खेळीमेळीच्या वातावरणात हे प्रशिक्षण दिले त्यामध्ये शेळी पालन व्यवसाय का करावा? शेळीपालन सुरू करण्यापूर्वी विचारात घ्यावयाच्या बाबी, उत्कृष्ट शेळीची निवड, शेळ्यांच्या देशी विदेशी जाती, शेळी संगोपनाच्या पद्धती, निवारा, आहार, मुरघास तयार करणे, नित्कृष्ट चाऱ्यावर प्रक्रिया, अझोला, शेळ्यांचे प्रजनन, करडांचे संगोपन, शेळ्यांचे व बोकडांचे विक्री व्यवस्थापन, बोकडाची किंमत काढण्याची पद्धती, शेळ्यांना रोग कसे होतात ते सांगून लसीकरणाचे महत्त्व पटवून दिले, जंतनाशक कार्यक्रम, सेंद्रिय शेतीचे महत्व, गांडूळ खत निर्मिती यासारखे अनेक विषयावर खूप सखोल अशी माहिती दिली तसेच महिलांनी एकात्मिक शेळीपालन व्यवसाय करण्याचे फायदे सांगून एकात्मिक शेळीपालन करण्यास प्रवृत्त केले. त्याचबरोबर सेंट ग्रामीण स्वयंरोजगार प्रशिक्षण संस्थेचे संचालक देशमुख सरांनी बँके विषयी माहिती देऊन बँकेतील खात्यांचे प्रकार समजून सांगितले तसेच प्रोजेक्ट रिपोर्ट कसा बनवावा याची माहिती सांगून वेगवेगळ्या योजना समजून सांगितल्या तसेच विशाल सरांनी आम्हाला उद्योजकीय विकासाचे गुण शिकून वेगवेगळे खेळ घेतले व एक चांगला व्यवसायिक कशाप्रकारे बनवू शकतो हे समजून सांगितले. त्याचबरोबर विम्याची देखील माहिती दिली. श्रीगोंदा तालुका व्यवस्थापक श्री. अडागळे सर यांनी प्रशिक्षणातील महिलांना अभियानात राबविल्या जाणाऱ्या इतर योजनांची माहिती दिली. आढळगाव प्रभागाचे प्रभाग समन्वयक श्री. ऋषिकेश रंधवे सर यांनी महिलांना शेळीपालन करण्याची प्रेरणा देऊन शुभेच्छा दिल्या पेडगाव येथील पशुवैद्यकीय अधिकारी डॉक्टर अश्विनी गायकवाड यांनी महिलांना पशुसंवर्धन विभागांतर्गत राबवल्या जाणाऱ्या योजनांची माहिती दिली.
हे प्रशिक्षण आयोजित करण्यासाठी गावपातळीवरील सीआरपी प्रज्ञा कुलकर्णी मॅडम कृषी सखी शुभांगी म्हस्के मॅडम तसेच पशु सखी हेमलता भुजबळ मॅडम यांनी विशेष कार्य पार पाडले हा सर्व ३१ दिवसाचा प्रशिक्षण कार्यक्रम निरंकारी भावनात पार पडला त्या साठी राऊत यांचे विशेष सहकार्य लाभले. कार्यक्रमात निरोप समारंभाचे आयोजन केले होते ‘अ ‘ वर्ग प्रशिक्षक महेश्वर गुंड सरांनी ३१ दिवस उपस्थित राहून प्रशिक्षकाची भूमिका पार पाडली. त्याचबरोबर सेंड ग्रामीण स्वयंरोजगार प्रशिक्षण संस्थेचे संचालक देशमुख सर पर्यवेक्षक विशाल वांडेकर सर, श्रीगोंदा पंचायत समितीतील सर्व अधिकारी पदाधिकारी यांचे आभार उषा केदारी यांनी मानले तर तसेच या प्रशिक्षणात जेवण व चहा याची दररोज प्रशिक्षणार्थी साठी सोय केली गेली होती ते जेवण उत्तम बनवल्या बद्दल शुभांगी म्हस्के यांचे व सर्व उपस्थित प्रशिक्षणार्थींचे आभार सेंट ग्रामीण स्वयंरोजगार प्रशिक्षण संस्थेच्या वतीने ‘ अ ‘ वर्ग प्रशिक्षक महेश्वर गुंड सर यांनी मानून कार्यक्रमाची सांगता केली.
