
६ खेळाडू जिल्हास्तरावर, तालुकास्तरावर ६ सुवर्ण, १० रौप्य,५ कांस्य.
श्रीगोंदा प्रतिनिधि : जिल्हा क्रीडा कार्यालय व श्रीगोंदा तालुका क्रीडा समिती यांच्या संयुक्त विद्यमाने १३ ऑगस्ट रोजी परिक्रमा पब्लिक स्कूल येथे झालेल्या शालेय तालुकास्तरीय तायक्वांदो स्पर्धेमध्ये श्रीगोंदा शहरातील नामांकित शिवाजीराव नागवडे डॅफोडील्स व कौशल्यादेवी नागवडे इंग्लिश मीडियम स्कूलच्या खेळाडूंनी ६ सुवर्ण,१० रौप्य,५ कास्य पदके पटकावून घवघवीत यश संपादन केले. सुवर्णपदक विजेत्या खेळाडूंची २८ व २९ ऑगस्ट रोजी जिल्हा क्रीडा संकुल, वाडिया पार्क अहिल्यानगर येथे होणाऱ्या जिल्हास्तरीय शालेय तायक्वांदो स्पर्धेसाठी निवड झाली आहे. सुवर्णपदक विजेते – आर्यन शिंदे, वैष्णवी शिंदे, यश खाकाळ, ओंकार ननवरे, सिया कोकणे, गायत्री भुजबळ रौप्यपदक विजेते – विघ्नेश चव्हाण, रुद्र बगाडे, राजवीर गायकवाड, स्वरित देशमुख, विश्वजीत नागवडे, शरयू लोंढे, कार्तिकी पवार, शरण्या पवार, जेनी साठे, राजकुमार गदादेकांस्यपदक विजेते – श्रुतिका पाचपुते, साईनाथ शेलार, प्रसाद शिंदे, रितेश भोपळे, स्वयम कदम तसेच तेजस्विनी गोरे, शरयू कांडेकर, श्रेयस चाकणे, आयुष गव्हाणे यांनी स्पर्धेमध्ये सहभाग घेतला.यशस्वी खेळाडूंना विद्यालयाचे प्रशिक्षक मास्टर जयेश आनंदकर यांच्यासह क्रीडा शिक्षक कैलास ढवळे, राजश्री नागवडे, अक्षयकुमार शिंदे, रोहित दानवे यांचे मार्गदर्शन लाभले. जिल्हास्तरीय स्पर्धेसाठी निवड झाल्याबद्दल तुळजाभवानी सेवा प्रतिष्ठानचे अध्यक्ष राजेंद्र दादा नागवडे, विश्वस्त अनुराधाताई नागवडे, निरीक्षक एस पी गोलांडे, मुख्याध्यापिका नीतू दुलानी यांच्यासह शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी अभिनंदन केले आहे.
