
निवडीबद्दल जयेश आनंदकर यांचे सर्व स्तरांतून अभिनंदन होत आहे.
गणेश सुपेकर
जिल्हा प्रतिनिधि अहिल्यानगर
अहिल्यानगर जिल्हा अमॅच्युअर तायक्वांदो असोसिएशनचे राष्ट्रीय पंच तथा श्रीगोंदा येथील संजय आनंदकर स्पोर्ट्स अकॅडमीचे प्रशिक्षक जयेश आनंदकर यांची २२ ते २४ ऑगस्ट दरम्यान विभागीय क्रीडा संकुल येरवडा, पुणे येथे होणाऱ्या “अस्मिता खेलो इंडिया वुमन्स तायक्वांदो लीग” स्पर्धेसाठी पंच म्हणून निवड झाली आहे.
भारतीय क्रीडा प्राधिकरण (SAI) च्या अंतर्गत युवा व्यवहार आणि क्रीडा मंत्रालय भारत सरकार, इंडिया तायक्वांदो, तायक्वांदो असोसिएशन ऑफ महाराष्ट्र यांच्या संयुक्त विद्यमाने स्पर्धेचे आयोजन करण्यात आले असून खेलो इंडिया अस्मिता लीग हा केंद्र सरकारच्या “खेलो भारत” नीती चा एक प्रमुख घटक आहे जो राष्ट्र उभारणी आणि महिला सक्षमीकरणासाठी खेळांना प्रोत्साहन देतो.अस्मिता लीग हे मुलींसाठी आपले कौशल्य दाखविण्यासाठी एक महत्वाचे व्यासपीठ आहे.
निवडीबद्दल जयेश आनंदकर यांचे सर्व स्तरांतून अभिनंदन होत आहे.
