
भिगवण : दैनिक संध्या परिवाराने समाजात विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या व्यक्तींचा नुकताच पुणे येथील पंडित जवाहरलाल नेहरू सभागृहात पुरंदरचे मा.आमदार संजय जगताप, सामाजिक कार्यकर्त्या तृप्तीताई देसाई, यांच्या हस्ते व अनाथाची माई स्वर्गीय सिंधुताई सपकाळ यांच्या कन्या ममताताई सपकळ, वृत्तपत्र समूहाच्या संपादिका ज्योती नाळे, यांच्या प्रमुख उपस्थित संध्याभूषण पुरस्कारा देऊन सन्मान केला. यामध्ये ग्रामीण भागातून कलाक्षेत्रात अभिनय करून रसिकांच्या मनावर अभिराज्य करून समाज प्रबोधन केल्याबद्दल इंदापूर तालुक्यातील डिकसळ येथील विजयकुमार भगवान गायकवाड यांना कला क्षेत्रातील संध्या भूषण पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. या निवडीनंतर भिगवण येथे विजयकुमार गायकवाड यांच्या सत्काराचे आयोजन केले होते यावेळी बोलताना आदिनाथ कारखान्याचे मा.चेअरमन धनंजय डोंगरे यांनी सांगितले की, समाजामध्ये अजुनही विविध प्रकारच्या अंधश्रद्धा असून समाजाचे प्रबोधन करण्यासाठी विजयकुमार गायकवाड यांनी बनवलेले लघुपट नेत्रदीपक असून ग्रामीण भागातून अशा प्रकारचे समाज प्रबोधनपर फिल्म बनवणे काळाची गरज असल्याचे सांगत संध्या परिवाराने गायकवाड यांचा केलेला सन्मान कौतुकास्पद आहे. यावेळी आदिनाथ कारखान्याचे मा. संचालक धुळाभाऊ कोकरे,करमाळा कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक नागनाथ लकडे, महादेव कामटे, आदिनाथ कारखान्याचे मा.संचालक राजेंद्र धांडे, मकाई कारखान्याचे मा.संचालक नंदकुमार भोसले,टाकळीचे मा. सरपंच डॉ.गोरख गुळवे,अजिनाथ लाळगे,को. चिंचोलीचे मा. सरपंच देविदास साळुंखे, सुरेश साळुंखे,मा.उपसंपच रणजित खांडेकर , चंद्रकांत जाधव,विश्वजीत हॉटेलचे मालक आप्पासाहेब बंडगर आदी मान्यवर उपस्थित होते.
