


विजयकुमार गायकवाड तालुका प्रतिनिधी इंदापूर
भिगवण: डिकसळ ( ता.इंदापुर) येथील संपत उत्तमराव काळे(वय ५४) यांचे दीर्घ आजाराने नुकतेच निधन झाले. काळे हे गेले 25 ते 30 वर्षे भारतीय आयुर्विमा महामंडळाचे विमा प्रतिनिधी म्हणून दौंड ,बारामती व इंदापूर या तालुक्यासह पुणे जिल्ह्याच्या काही भागात कार्यरत होते. 25 वर्षांपूर्वी भारतीय आयुर्विमा महामंडळाचे महत्व ग्रामीण भागात पोहोचवून त्याकाळी करोडपती विमा प्रतिनिधी म्हणून त्यांना भारतीय महामंडळाने सन्मानित केले होते. गेले कित्येक दिवस त्यांच्यावर बारामती येथील खाजगी रुग्णालयात उपचार सुरू होते.मा.सहकारमंत्री हर्षवर्धन पाटील यांनी त्यांच्या कुटुंबांचे भेट घेऊन सांत्वन केले .त्यांच्या मागे आई, पत्नी एक मुलगी दोन भाऊ असा परिवार आहे.पोलीस खात्यामधील राष्ट्रपती सुवर्णपदकप्राप्त अनिल काळे व कर्मयोगी शंकरराव पाटील सहकारी साखर कारखान्याचे संचालक सतीश काळे हे त्यांचे बंधू आहेत.
