सोपान सासवडे.
जिल्हा ग्रामीण अहिल्यानगर.

आजच्या तरुण पिढीने महापुरुषांचे विचार प्रत्यक्षात कृतीमध्ये आणून स्वतःची प्रगती करणे गरजेचे आहे. महापुरुषांच्या केवळ कथा वाचून व भाषणे ऐकून समजत नसतात तर त्यांचे विचारांचं अनुकरण करून त्यांच्या विचारापासून प्रेरणा घेऊन आपण आपले भविष्य घडविले पाहिजे असे उद्गार चापडगाव माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयाचे प्राचार्य श्री. अरुण वावरे यांनी डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३४ व्या जयंतीनिमित्ताने अध्यक्ष स्थानावरून ते मार्गदर्शन करत होते. विद्यालयामध्ये डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती मोठ्या उत्साहामध्ये साजरी करण्यात आली. कार्यक्रम प्रसंगी व्यासपीठावर पर्यवेक्षक लक्ष्मण गाडे , सर्जेराव निकाळजे सर्व कर्मचारी व मान्यवर उपस्थित होते. प्राचार्य वावरे यांनी आपल्या विचाराच्या माध्यमातून डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना त्यांनी अभिवादन केले. शिक्षक प्रतिनिधी म्हणून श्री सर्जेराव निकाळजे यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची संघर्ष गाथा अभ्यासपूर्ण प्रस्तुत केली. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी ज्ञान मिळवण्यासाठी अथक परिश्रम घेतले . परिश्रम घेऊन या जगामध्ये ‘द सिम्बॉल ऑफ द नॉलेज’ म्हणजेच ज्ञानाचे प्रतीक म्हणून गणले गेले तसेच अनेक आंदोलने केली त्या आंदोलनाच्या माध्यमातून दलित समाजाला न्याय मिळवून देण्याचा प्रयत्न केला . त्यांनी अथक परिश्रमातून या देशाचे संविधान निर्माण केले की ज्यामुळे या देशांमध्ये समता, बंधुता ,स्वातंत्रता निर्माण झालेली आहे अशा या महापुरुषांचे विचार आपण प्रत्यक्षात कृतीमध्ये आणले पाहिजेत असे उद्गार याप्रसंगी काढले गेले. यावेळी विद्यार्थी प्रतिनिधी म्हणून चि.शिवराज सतीश गोरे, कु.श्रद्धा गोरे,श्रावणी काकडे, आकांक्षा पातकळ या विद्यार्थ्यांची समयोचीत भाषणे झाली. कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रा.ज्योतीक यांनी केले सूत्रसंचालन भाऊसाहेब गायकवाड तर आभार श्रीमती शितल दहिवाळकर यांनी मानले.कार्यक्रम यशस्वीतेसाठी सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी वृंदांचे सहकारी लाभले.
