
दि.२८ एप्रिल.
समता परिषदेच्या प्रदेश चिटणीस डॉ स्नेहा ताई सोनकाटे यांच्या प्रमुख उपस्थिती मध्ये आयोजित करण्यात आली.यावेळी आजी माजी ज्येष्ठ पुणे ग्रामीण ,पुणे शहर ,पिंपरी चिंचवड येथील पदाधिकारी उपस्थित होते.
यावेळी सर्व ओबीसी भटके विमुक्त मागास घटकातील जातीमधील युवकांना संधी प्रतिनिधित्व मिळावे यासाठी रिक्त पदे आहे त्याठिकाणी नवीन नियुक्ती करण्याचे आयोजन केलं..
आणि महात्मा फुले यांचा चित्रपट पुण्यात गरजू लोकांना मोफत पाहण्यात यावा यासाठी चर्चा करण्यात आली .
ओबीसी चे देशाचे नेतृत्व आदरणीय भुजबळ साहेब यांच्या वर टीका टिप्पणी सहन करणार नाही जशास तसे उत्तर देऊ.
आणि ओबीसी आरक्षण संरक्षणासाठी आक्रमक परत एकदा लढा देऊ .
तसेच मे महिन्यात पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर जयंती उत्सव साजरा करण्याबाबत चर्चा करण्यात आली…


