
श्रीगोंदा येथील तुळजाभवानी सेवा प्रतिष्ठान चे कौशल्यादेवी नागवडे इंग्लिश मिडीयम स्कूल व शिवाजीराव नागवडे डॅफोडील्स स्कूल चा इयत्ता दहावीचा निकाल 100% लागला अशी माहिती मुख्याध्यापक नीतू दुलानी यांनी दिली.
महाराष्ट्र स्टेट बोर्ड व सीबीएसई चा इयत्ता दहावीचा निकाल नुकताच जाहीर झाला, यामध्ये विद्यार्थ्यांनी 100% निकालाची परंपरा कायम ठेवली आहे. चिन्मय ससाने, रुद्राक्ष वाबळे, श्रुती घोडके,वेदांती नागवडे, सत्यजित झणझने, श्रावणी जगताप यांनी अनुक्रमे पहिला दुसरा व तिसरा क्रमांक पटकावला.
यावेळी तुळजाभवानी सेवा प्रतिष्ठानचे अध्यक्ष राजेंद्रदादा नागवडे,विश्वस्त अनुराधाताई नागवडे, निरीक्षक एस. पी. गोलांडे, मुख्याध्यापिका नीतू दुलानी शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी विद्यार्थ्यांना पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.
