क्रीडा ग्रेस गुणांचा लाभ.

श्रीगोंदा प्रतिनिधि :- महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने नुकताच इयत्ता १० वी चा निकाल घोषित केला. संजय आनंदकर स्पोर्ट्स अकॅडमी ची खेलो इंडिया पदक विजेती तसेच राष्ट्रीय खेळाडू श्रावणी मनोहर लकडे हिने ९८.४० गुणांसह श्रीगोंदा तालुक्यामध्ये प्रथम येण्याचा मान मिळविला. २०२४-२५ या शैक्षणिक वर्षात श्रावणी हिने राज्यस्तरीय स्पर्धेत सुवर्णपदक मिळविल्याने तिला १५ क्रीडा ग्रेस गुण मिळाले आहेत.मिनिस्ट्री ऑफ युथ अँड स्पोर्ट गव्हर्मेंट ऑफ इंडिया तसेच महाराष्ट्र ओलंपिक असोसिएशन यांची मान्यता असलेल्या अधिकृत राज्य आणि राष्ट्रीय स्तरावरील स्केटिंग, तायक्वांडो, किक बॉक्सिंग खेळांच्या स्पर्धेमध्ये सहभाग घेत प्राविण्य मिळविल्याने खेळाडूना क्रीडा ग्रेस गुण दिले जातात.अकॅडमीच्या इ.१० वी च्या १० तसेच इ.१२ वी च्या ३ खेळाडूना राष्ट्रीय स्पर्धेतील प्राविण्याबद्दल २० तर राज्यस्तरीय स्पर्धेतील प्राविण्याबद्दल १५ गुण मिळाले आहेत.राष्ट्रीय स्पर्धेतील प्राविण्याबद्दल २० गुण मिळविलेले खेळाडू – सृष्टी काळे, प्रणव रायकर, जय शेलार.राज्यस्तरीय स्पर्धेतील प्राविण्याबद्दल १५ गुण मिळविलेले खेळाडू – श्रावणी लकडे, सोफिया शेख, सिद्धी वाळुंज (इ.१२ वी), साक्षी गांजुरे (इ.१२ वी)राज्यस्तरीय स्पर्धेतील सहभागाबद्दल १० गुण मिळविलेले खेळाडू – ओंकार गोरे, अंतरा बळे, सृष्टी कोथिंबीरे, अर्पिता गोरे, शबनम शेख (इ.१२ वी)तर जिल्हास्तरीय शालेय स्पर्धेतील प्राविण्यबद्दल यश पिपाडा यास ५ गुण मिळाले आहेत.
गेल्या ३४ वर्षांपासून श्रीगोंदा शहरासह तालुक्यामध्ये विनामूल्य मार्शल आर्ट चे प्रशिक्षण देत असून प्रत्येक वर्षी आपले खेळाडू जिल्हा, विभाग, राज्य तसेच राष्ट्रीय स्पर्धांमध्ये पदके मिळवून श्रीगोंदा तालुक्याचे नावलौकिक देशभरामध्ये उंचावतात याचा अभिमान असून अभ्यासाबरोबरच खेळही तितकाच महत्त्वाचा आहे. कारण राज्य तसेच राष्ट्रीय पातळीवरील स्पर्धांमध्ये प्राविण्य मिळवल्याबद्दल बोर्डाकडून खेळाडूंना क्रीडा ग्रेस गुण दिले जातात ज्याचा फायदा विद्यार्थ्यांना शालेय पातळीवर होतो. – ग्रँडमास्टर संजय आनंदकर.
