

तुळजाभवानी सेवा प्रतिष्ठानचे अध्यक्ष राजेंद्रदादा नागवडे, विश्वस्त अनुराधाताई नागवडे यांच्या मार्गदर्शनाखाली तुळजाभवानी सेवा प्रतिष्ठान व GDIOT (जेनियस इडियट) यांच्या संयुक्त विद्यमाने नागवडे इंग्लिश मीडियम स्कूल येथे प्रशिक्षण शिबिर संपन्न झाले.
या प्रशिक्षण शिबिरामध्ये इयत्ता चौथी ते नववी च्या विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवला. या शिबिरात ड्रोन बनवणे, ड्रोन साठी लागणारे साहित्य, ड्रोन उडवणे याची सर्व माहिती प्रात्यक्षीत सहित करून दाखवली. यावेळी विद्यार्थ्यांनी स्वतः ड्रोन तयार करून ड्रोन उडवण्याचे प्रशिक्षण देखील घेतले.
तुळजाभवानी सेवा प्रतिष्ठानचे अध्यक्ष राजेंद्र दादा नागवडे यांच्याशी संपर्क केला असता त्यांनी सांगितले की नवीन शैक्षणिक धोरणानुसार विद्यार्थ्यांना पुस्तकी ज्ञानाबरोबर व्यवहारिक, प्रॅक्टिकली ज्ञान देखील असणे आवश्यक आहे याच अनुषंगाने विद्यार्थ्यांच्या सुप्त कलागुणांना वाव मिळावा यासाठी हे ड्रोन प्रशिक्षण शिबीर आयोजित केले होते. अमेरिका व चीन या देशामध्ये स्टेम शैक्षणिक पद्धत अवलंबली जाते या स्टेम शैक्षणिक पद्धत वापरल्यामुळे अमेरिका हा महासत्ता बनला आहे. त्याचाच एक भाग म्हणून ड्रोन प्रशिक्षण शिबिर आहे. अशाच प्रकारे शैक्षणिक प्रणाली मध्ये सुधारणा केल्यास भारत देश देखील महासत्ता बनायला वेळ लागणार नाही असे मत राजेंद्रदादा नागवडे यांनी व्यक्त केले.
यावेळी निरीक्षक एस. पी. गोलांडे यांनी सागितले की अहमदनगर जिल्ह्यातील शैक्षणिक क्षेत्रात अग्रेसर अशी ही शैक्षणिक संस्था असून या संस्थेचे विद्यार्थी हे सर्वच क्षेत्रामध्ये कार्यरत आहेत. संस्थेचा आलेख अशा प्रशिक्षण शिबिरामुळे दिवसेंदिवस उंचावत चाललेला आहे. या ड्रोन प्रशिक्षण शिबिरासाठी विद्यार्थ्यांबरोबर पालक देखील उत्साहित होते.
हे शिबिर यशस्वी करण्यासाठी तुळजाभवानी सेवा प्रतिष्ठानचे अध्यक्ष राजेंद्रदादा नागवडे, विश्वस्त अनुराधाताई नागवडे, निरीक्षक एस. पी. गोलांडे, मुख्याध्यापक नीतू दुलाणी, GDIOT (जीइडियट) चे संस्थापक अध्यक्ष श्री. विक्रांत पाटील यांचे मार्गदर्शन लाभले. या ड्रोन प्रशिक्षण शिबिरासाठी समन्वयक म्हणून प्राध्यापक सुरेश म्हेत्रे यांनी जबाबदारी पार पाडली.
