

तुळजाभवानी सेवा प्रतिष्ठानचे अध्यक्ष राजेंद्रदादा नागवडे,विश्वस्त अनुराधाताई नागवडे, निरीक्षक एस. पी. गोलांडे यांच्या मार्गदर्शनाखाली दि. २८ फेब्रुवारी रोजी राष्ट्रीय विज्ञान दिनाचे औचित्य साधून विज्ञान प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले होते. विद्यार्थ्यांनी विविध वैज्ञानिक उपकरणे तयार करून त्याबद्दल माहिती दिली. यामध्ये ऍसिड रेन, जलशुद्धीकरण प्रकल्प,ग्रहमाला इ. प्रकारचे वैज्ञानिक उपकरणे विद्यार्थ्यांनी सादर केले. यावेळी कार्यक्रमाचे उद्घाटन मुख्याध्यापिका नीतू दुलानी यांनी केले. यावेळी बोलताना त्यांनी सांगितले की शालेय स्तरावर विज्ञान दिन साजरा केल्याने विद्यार्थ्यांमध्ये वैज्ञानिक दृष्टिकोन तयार होऊन कल्पनाशक्ती वाढण्यास मदत होते. विज्ञान आणि तंत्रज्ञान अशी सांगड घातल्यास नवनवीन अविष्कार तयार होऊ शकतात यावरती आपण नक्कीच प्रयत्न कराल अशी अपेक्षा व्यक्ती त्यांनी व्यक्त केली. यावेळी विज्ञान शिक्षक प्रा. राहुल कोऱ्हाळे, प्रा. योगेश सागडे, प्रा. कावेरी शिंदे, प्रा. सुरज घोडेकर, प्रा. अक्षय मेहेत्रे, प्रा.शुभांगी गायकवाड,प्रा.रेश्मा कांबळे यांचे सहकार्य लाभले. यावेळी सूत्रसंचालन प्रा. योगेश सागडे यांनी केले आभार प्रा. सरिता सुपेकर यांनी मानले.
