
सिंधुदुर्ग प्रतिनिधी ; संजय भोसले
शिक्षण क्षेत्रात दिवसेंदिवस झपाट्याने बदल होत आहेत नविन शैक्षणिक धोरण संथ पावलाने येत आहे शिक्षण विकासात विविध संघटना कार्य करत आहेत प्रत्येक संघटनेचे बळ त्यांच्या कार्यातून दिसून येते संघटनेत कार्यकरणारा नेता आपल्या अंगभूत कौशल्याने मोठा होत असतो मुख्याध्यापक संघटना ही सर्वात मोठी राज्यव्यापी संघटना आहे शासनाचा महत्वाचा दुवा सांधणारी संघटना म्हणून ह्या संघटनेचा लौकीक आहे पायाभूत शैक्षणिक समस्या पुषकळ आहेत काही समस्या ह्या संख्या व शिक्षक यांच्या असतात तसेच शिक्षक – शिक्षक समस्या वेगळ्याच आहे शिक्षकेतर कर्मचारी यांच्या समस्या शिवाय शासनाची विविध धोरणे असंख्य परिपत्रके त्वरित येणारे ईमेल यातून मुख्याध्यापक हैराण होत असतो अशावेळी मुख्याध्यापकांची संघटना ही वैचारिक तापळीवर घुसळण करून योग्य मार्ग काढून मार्गदर्शन करत असते . आदरणीय श्री वामन तर्फेसर हे सर्वगुण संपन्न असे मुख्याध्यापक संघटनेचे कार्यकर्ते आहेत शिरवंडे सारख्या ग्रामीण भागात ज्ञान दानाचे कार्य करत करत संपूर्ण सिंधुदुर्ग जिल्ह्याचे नेतृत्व आपल्या कार्यकुशलतेने करत आहेत शांत ‘संयमी ‘ आणि अभ्यासू व्यक्तीमत्व म्हणून सरांची ख्याती महाराष्ट्रभर पसरली आहे सर्वांशी विनयशील वृत्तीने वागून जिल्हातील शिक्षक व मुख्याध्यापक संस्था चालक यांच्या समस्या आपल्या मधूर वाणीने सोडविण्याचे कार्य सर नेहमी करत आले आहेत शिक्षण क्षेत्रातील परिपत्रांचा बारकाईने अभ्यास करून सरांनी आपले नेतृत्व सिद्ध केले आहे . जिल्हा शिक्षण अधिकारी ‘ सचिव तसेच राज्य संघटना यांच्यातील कामांची योग्य दखल घेऊन सर्वांना योग्य न्याय मिळवून देण्यासाठी सतत पाठपुरावा करणारे उमदे नेतृत्व म्हणून सरांनी नाव मिळविले म्हणून आज झालेल्या मुख्याध्यापक संघाच्या निवडणुकीत श्री वामन तर्फेसर सर्वांना पुन्हा हवे हवेसे वाटले म्हणून त्यांच्या अध्यक्ष पदाला कोणताही विरोध न करता सर सर्वांच्या संमंतीने बिनविरोध निवडून आले आणि सुंदर फुलांचा हार गळ्यात घालून जिल्हयाच्या नेतृत्वाची धुरा सांभाळण्यासाठी सिद्ध झाले
सरांच्या अफाट कार्याला मनापासून सलाम
डॉ .पी जे कांबळे
कणकवली
सिंधुदुर्ग .
