
प्रगती लॉन्स ढोकराई फाटा येथेजिल्हा परिषद प्राथमिक शाळेचे वार्षिक स्नेहसंमेलन व अविष्कार कलागुणांचा कार्यक्रम उत्साहात पार पडला. यावेळी विद्यार्थ्यांनी सादर केलेल्या मूकनाटिका, विविध थीम नृत्य, लावणी व विविध लोककलांनी उपस्थितांची मने जिंकली . या कार्यक्रमाचे कौतुक करताना पालकांनी शाळेसाठी तब्बल दीड लाख रुपयांची बक्षीसरुपी रक्कम शाळेला दिली. शालेय चिमुकल्यांनी केलेले बहारदार सूत्रसंचालन उपस्थितांचा कौतुकाचा विषय ठरला. कार्यक्रमाचे सुंदर नियोजन व मुलांची चांगली तयारी घेतल्याबद्दल शिक्षकांचे पालक वर्गाकडून विशेष कौतुक करण्यात आले. हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी श्री. साबळे सर यांनी विशेष परिश्रम घेतले.
