
पैठण प्रतिनिधी श्रीपत पवार.
हि घटना हर्षी बुद्रुक येथे रविवारी दिनांक एक डिसेंबर रोजी रात्री पावणे एक वाजेच्या सुमारास घडली चोरट्यांनी ज्या घरात लोक आहेत त्या घराचा कडी कोंडा बाहेरून लावून दुसऱ्या घराचा कडी कोंयडा तोडून कपाटात ठेवलेले सोन्या-चांदीच्या दागिन्यासह रोख पन्नास हजार रुपये असा जवळपास पावणेतीन लाखाचा ऐवज चोरून नेला या धाडसी चोरीमुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे याविषयी अधिक माहिती अशी की पैठण तालुक्यातील हर्षी बुद्रुक येथील शेतकरी गोरख आप्पासाहेब घायाळ हे आपल्या कुटुंबासह राहतात नेहमीप्रमाणे रविवारी घायाळ कुटुंबीय जेवण आटवून झोपी गेले ते गाढ झोपेत असताना मध्यरात्रीनंतर चोरट्यांनी गोरख घायाळ यांच्या घरात प्रवेश केला प्रथम दरोडेखोरांनी गोरख घायाळ व कुटुंबीय ज्या घरात झोपले होते त्याच्या बाजूला असलेल्या दुसऱ्या खोलीत झोपलेले शरद घायाळ यांचे खोलीचा दरवाजा बाहेरून लावून घेतला व दरवाज्याच्या कडी कोंडा तोडून हात प्रवेश केला गोरख घायाळ व त्यांच्या पत्नी हे दुसऱ्या खोलीत झोपलेले होते दरोडेखोरांनी कपाटातील सामान बाहेर काढून फेकण्यास सुरुवात केली त्याचा आवाज ऐकून गोरख घायाळ यांना जाग आली दरवाजा उघडण्यासाठी प्रयत्न केला असता बाहेरून दरोडेखोरांनी दरवाज्याची कडी लावून घेतली होती गोरख घायाळ यांनी मोबाईल द्वारे शेजाऱ्यांना कळविले मात्र ते येईपर्यंत चोरटे पसार झाले होते ग्रामस्थांनी घटनास्थळी धाव घेऊन दरोडेखोरांचा कसून शोध घेण्याचा प्रयत्न केला परंतु चोरटे अंधाराचा फायदा घेऊन पळून जाण्यात यशस्वी झाले सोमवारी सकाळी घटनास्थळी पाचोड पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक शरदचंद्र रोडगे बीट जमादार अण्णासाहेब गव्हाणे यांनी सहकार्यासह पाहणी करून पंचनामा केला या प्रकरणी गोरख घायाळ यांच्या फिर्यादीवरून पाचोड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला या धाडसी चोरीमुळे ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे.
