
पैठण प्रतिनिधी श्रीपत पवार.
दावरवाडी येथे दिनांक 4 /12/2024 रोजी जिल्हा एड्स नियंत्रण व प्रतिबंधक पथक जिल्हा सामान्य रुग्णालय छत्रपती संभाजी नगर आणि ग्रामीण रुग्णालय पाचोड आयसीटीसी व एमजी व्हीएस एनजीओ यांच्या संयुक्त विद्यमानाने डॉक्टर मोती पवळे जिल्हा शल्य चिकित्सक डॉक्टर अनिल पवार वैद्यकीय अधीक्षक श्रीमती साधना गंगावणे जिल्हा कार्यक्रम अधिकारी संजय पवार पर्यवेक्षक यांच्या मार्गदर्शनानुसार दावरवाडी येथे एक डिसेंबर जागतिक एड्स दिन सप्ताह निमित्त एचआयव्ही एड्स माहिती व जनजागृती कार्यक्रम न्यू हायस्कूल दावरवाडी येथे घेण्यात आला याप्रसंगी श्री गडकरी यांनी कॉलेज मधील मुलांना एचआयव्ही एड्स विषयी मार्गदर्शन केले या कार्यक्रमाप्रसंगी पोस्टर प्रदर्शन करण्यात आले याप्रसंगी सरपंच श्री ज्ञानेश्वर जाधव आणि कॉलेजचे प्राचार्य गोजरे सर व शिक्षक वृंद हजर होते श्री कापरे यांनी आय ईसी वाटप केले हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी छाया कापरे व संतोष कुलकर्णी एमजी व्हीएस एनजीओ यांनी सहकार्य केले.
