परभणी प्रतिनिधी श्यामराजे साखरे

गंगाखेड:- गंगाखेड शहरातील मुख्य चौक असलेल्या भगवती मंदिर शिवाजी चौक येथे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा महापरिनिर्वाण दिन साजरा करण्यात आला.आपल्या अफाट बौद्धिक कौशल्य आणि बुद्धिमत्तेच्या बळावर सबंध मानव जातीचे भारतीयांचे जीवन बदलण्याची क्रांती या महामानवांनी केली त्यांच्या विचारांचा जागर झाला पाहिजे यासाठी सर्व महापुरुष जयंती कमिटीचे सदस्य यांनी जयंती साजरी केली.महापुरुष जयंती कमिटीच्या वतीने सर्व महापुरुषांची जयंती, स्मृतीदिन साजरी करण्याच्या पाठीमागे असलेला उद्देश म्हणजेजनसामान्यांमध्ये समतेची बिजे रुजावीत, सर्वांनी बंधूभावाने वागावे व समरसता निर्माण व्हावी हा उद्देश ठेवून महापुरुष जयंती कमिटीच्या वतीने महामानव भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा महापरिनिर्वाण दिन साजरा करण्यात आला. यावेळी उपस्थित महापुरुष जयंती समितीचे संकल्पक तथा भारतीय किसान संघाचे तालुका अध्यक्ष माधवराव चव्हाण, बंजारा समाजाचे ज्येष्ठ नेते तथा भाजपा ज्येष्ठ नेते बाबुरावजी पवार मामा , वाघलगावचे मा. सरपंच नारायणराव घनवटे, मालेवाडी चे माजी सरपंच श्रीकांतजी गायकवाड, बालासाहेब यादव, डिगांबर यादव,, डॉक्टर सचिन सुपेकर, सागरभाऊ गोरे, नेमीचंद नखत जैन, पोलीस बांधव यांच्यासह महापुरुष जयंती कमिटीचे सर्व पदाधिकारी कार्यकर्ते, शहरातील व्यापारी बांधव व नागरीक उपस्थित होते.
