पैठण प्रतिनिधि श्रीपत पवार

श्रीक्षेत्र पैठण येथील शांती ब्रह्म श्री एकनाथ महाराज संस्थांच्या विश्वस्त मंडळाचे अध्यक्षपदी नवनिर्वाचित आमदार श्री विलास बापू भुमरे यांची बिनविरोध निवड दिनांक 6 डिसेंबर शुक्रवार रोजी विश्वस्त मंडळाच्या बैठकीत करण्यात आली सदर बैठक श्री संत एकनाथ महाराज संस्थांचे विश्वस्त रघुनाथ महाराज गोसावी पालखी वाले यांच्या अध्यक्षतेखाली दुपारी बारा वाजता पार पडली विश्वस्त तथा छत्रपती संभाजी नगरचे अप्पर जिल्हाधिकारी अरविंद लोखंडे कार्यकारी विश्वस्त दादा पाटील बारे विश्वस्त विठ्ठल महाराज चनघटे शास्त्री डॉक्टर गणेश मोहिते यांची उपस्थिती होती विश्वस्त मंडळाने माजी नाथ संस्थानचे अध्यक्षपदी बिनविरोध निवड केली असून येणाऱ्या काळात संस्थांना वैभवशाली बनण्यासाठी माझा प्रयत्न राहील नाथ महाराजांच्या व पैठणच्या जनतेने मला सेवा करण्याची संधी दिली ते मी माझे भाग्य समजतो अशी भावना नवनिर्वातीत आमदार तथा श्री शांती ब्रह्म एकनाथ महाराज संस्थानचे अध्यक्ष श्री विलास बापू भुमरे यांनी व्यक्त केली
