उपसंपादक सुरेश म्हेत्रे

शालेय शिक्षणाबरोबर विद्यार्थ्यांच्या सुप्त कलागुणांना वाव मिळावा त्यांच्यामध्ये खेळाविषयी आवड, आदर निर्माण व्हावा आणि शारीरिक,भौतिक,मानसिक विकास घडावा हाच हेतु लक्षात घेऊन तुळजाभवानी सेवा प्रतिष्ठानचे अध्यक्ष राजेंद्र दादा नागवडे, विश्वस्त अनुराधाताई नागवडे यांच्या मार्गदर्शनाखाली तुळजाभवानी सेवा प्रतिष्ठान संचालित कौशल्यदेवी नागवडे इंग्लिश मीडियम स्कूल व शिवाजीराव नागवडे डॅफोडिल्स स्कूल यांच्या संयुक्त विद्यमाने क्रीडा सप्ताहाचा शुभारंभ निरीक्षक एस.पी.गोलांडे,मुख्याध्यापिका नीतू दुलानी, क्रीडा शिक्षक कैलास ढवळे, रोहित दानवे, जयेश आनंदकर, राजश्री नागवडे,शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांच्या उपस्थितीत पार पडला. या क्रीडा सप्ताहामध्ये कबड्डी, खो-खो रस्सीखेच, 100 व 200 मीटर धावणे फुटबॉल,हॉलीबॉल, लांबउडी, उंचउडी, ॲथलेटिक्स,डॉशबॉल, बॉक्सिंग अशा विविध खेळांचा समावेश करण्यात आला होता. आपल्या शारीरिक आणि मानसिक आरोग्यासाठी खेळ आवश्यक आहे ते आपल्याला तंदुरुस्त राहण्यास आपली एकाग्रता सुधारण्यास आणि आपला आत्मविश्वास वाढविण्यास मदत करतात असे मत यावेळी बोलताना निरीक्षक एस. पी.गोलांडे यांनी व्यक्त केले. शालेय जीवनात खेळ अत्यंत महत्त्वाचे आहे.खेळाच्या नियमित प्रयोगाने शारीरिक आणि मानसिक रूपात आरोग्य, तंदुरुस्ती असे प्रमुख महत्त्वाचे लाभ होतात. असे मत मुख्याध्यापिका नीतू दूलानी यांनी व्यक्त केले. यावेळी सूत्रसंचालन क्रीडा शिक्षक कैलास ढवळे यांनी केले,आभार राजश्री नागवडे यांनी मानले.



