
परभणी तालुक्यांतील जिल्हा प्राथमिक शाळा तट्टु जवळा येथील शालेय व्यवस्थापन समिती अध्यक्ष पदी तुकाराम (बाळु) कोंडिबा कदम यांची बिनविरोध निवड करण्यात आली. त्यांच्या या निवडी बद्दल सर्व स्तरातुन स्वागत होत आहे. प्रतिनिधिशी बोलताना त्यांनी सांगितले की मुलांना दर्जेदार शिक्षण मिळावे यावर जातिने लक्ष देवून तट्टु जवळा जिल्हा परिषद प्राथमिक शाळा येणाऱ्या काळात परभणी तालुक्यांतील एक आदर्श शाळा म्हणून ओळख निर्माण होईल असे प्रयत्न आपण करणार आहोत.
