ज्यांना तुम्ही मते दिली ते संकट काळात गायब झाले- ॲड. प्रकाश आंबेडकर
मुंबई : एससी, एसटी आणि ओबीसींनी नेहमी एकत्र राहावे, सामाजिक युती करावी आणि राजकीय सत्ता स्वत:च्या हातात घ्यावी, असे आवाहन वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष ॲड. प्रकाश आंबेडकर यांनी ट्विटद्वारे केले आहे.
ॲड. आंबेडकर यांनी म्हटले आहे की, ज्या निरुपयोगी लोकांना तुम्ही तुमचे मत दिले, ते तुमच्या संकटाच्या काळात गायब झाले. त्यांनी तुम्हाला वाऱ्यावर सोडून दिले. आपला लढा हा आपल्यालाच लढावा लागेल, हे आपण कधी शिकणार? अजूनही वेळ आहे, समजून घ्या.
परभणी येथील संविधानाच्या विटंबनेप्रकरणी महाविकास आघाडीचे नेते कुठे आहेत ? असा सवाल वंचित बहुजन आघाडीने उपस्थित केला आहे. महाविकास आघाडीने लोकसभा आणि विधानसभेच्या निवडणुकीत संविधानाच्या मुद्द्यावर मते घेतली. पण परभणी घटनेच्या विरोधात आवाज उठवला नाही. या पार्श्वभूमीवर ॲड. आंबेडकर यांनी एससी, एसटी आणि ओबीसी यांनी एकत्रित येण्याची गरज असल्याचे म्हटले आहे.
ॲड.प्रकाश आंबेडकर यांचं परभणी येथील प्रकरणवरच मत
