
सिंधुदुर्ग प्रतिनिधी ; संजय भोसले.
भारतीय बौद्ध महासभा जिल्हा महिला शाखा सिंधुदुर्ग अंतर्गत कुडाळ महिला तालुका शाखा व सर्व तालुका महिला शाखा यांच्या संयुक्त विद्यमाने स्त्री मुक्ती दिन तथा मनुस्मृति दहन दिन 25 डिसेंबर 2024 रोजी वेताळ बांबर्डे कपिल नगर तालुका कुडाळ येथे महिला जिल्हाध्यक्ष आद. सुषमाताई हरकुळकर यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाला. या कार्यक्रमास जिल्हाध्यक्ष आद. आनंद कासार्डेकर माजी राष्ट्रीय सचिव आद. प्रभाकर जाधव माजी महाराष्ट्र राज्य संघटक आद. विजय जाधव जिल्हा सरचिटणीस आद. संजय पेंडूरकर संरक्षण उपाध्यक्ष आद. दिलीप कदम पर्यटन प्रचार उपाध्यक्ष आद. भीमराव जाधव जिल्हा संघटक आद. पं.ध. माणगावकर आद. विश्वनाथ कदम महिला सरचिटणीस आद. अपूर्वाताई पवार संस्कार उपाध्यक्षा आद. स्नेहाताई पेंडूरकर पर्यटन उपाध्यक्षा आद. संचिताताई जाधव संस्कार सचिवा आद ऋतुजाताई चेंदवनकर हिशोब तपासणीस आद. साक्षीताई खानोलकर जिल्हा संघटक आद.लीनाताई तळगांवकर वंचित बहुजन आघाडीचे जिल्हाध्यक्ष आद. महेश परूळेकर कुडाळ तालुका अध्यक्ष आद. निलेश जाधव सरचिटणीस आद. रामचंद्र वालावलकर कोषाध्यक्ष आद. आर. डी.बांबर्डेकर कुडाळ महिला तालुका शाखा अध्यक्षा आद. अंकिता ताई कदम सरचिटणीस आद नंदिनीताई पिंगुळकर कोषाध्यक्ष आद धनश्रीताई वालावलकर संरक्षण उपाध्यक्ष आज्ञाताई कदम कुडाळ तालुका सर्व पदाधिकारी उपस्थित होते मालवण तालुकाध्यक्ष आद. रविकांत कदम महिला सरचिटणीस आद समताताई डिकवलकर संघटक आद विशाखाताई कदम कणकवली तालुका सरचिटणीस आद सुभाष जाधव कणकवली तालुका महिला आद. अध्यक्षा आशाताई भोसले कोषाध्यक्ष आद. रवीना ताई कांबळे सावंतवाडी तालुकाध्यक्ष आद विजय नेमळेकर आद. आर.जी. चौकेकर आद.बी.पी. कांबळे सावंतवाडी महिला अध्यक्ष मीनाक्षीताई तेंडुलकर सरचिटणीस गौतमीताई कांबळे कोषाध्यक्ष सुवर्णाताई तेंडुलकर वेंगुर्ला तालुका सरचिटणीस लाडू जाधव बांबर्डे गावचे ज्येष्ठ कार्यकर्ते सभासद बांबर्डेकर गुरुजी कणकवली कुडाळ मालवण सावंतवाडी वेंगुर्ला दोडामार्ग शाखेतून महिला कार्यकर्त्या उपस्थित होते.
या कार्यक्रमाची सुरुवात अध्यक्षा आद. सुषमाताई हरकुळकर यांच्या हस्ते ध्वजारोहण करून करण्यात आले. सर्व मान्यवरांच्या हस्ते प्रतिमापूजन दीप प्रज्वलन व धूप प्रज्वलन करून त्रिसरण पंचशील घेण्यात आले. या कार्यक्रमास उपस्थित सर्व मान्यवरांचे स्वागताध्यक्षा आद. अंकिता ताई कदम यांनी पुष्प देऊन स्वागत केले कार्यक्रमाचे सूत्रसंचालन जिल्हा सरचिटणीस अपूर्वा ताई पवार व तालुका सरचिटणीस नंदिनीताई पिंगुळकर यांनी केली प्रथम सत्रामध्ये एन. सी. डी. विभाग ग्रामीण रुग्णालय कुडाळ येथील अधिकारी आद. गायत्री कुडाळकर यांनी
‘महिलांचे मानसिक आरोग्य’ या विषयावर मार्गदर्शन केले जिल्हाध्यक्ष आनंद कासार्डेकर यांनी मनुस्मृति दहन दिनाचे महत्त्व विशद केले. जिल्हा सरचिटणीस संजय पेंडूरकर यांनी ‘डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे महिलांसाठी संदेश’ या विषयावर मार्गदर्शन केले. आद. प्रभाकर जाधव आद. विजय जाधव आद. महेश परुळेकर यांनी कार्यक्रमास शुभेच्छा दिल्या. त्यानंतर अध्यक्ष मार्गदर्शन करताना सुषमाताई हरकुळकर यांनी ‘मातृसत्ताक पद्धती ते स्त्रियांची गुलामगिरी आणि त्यातून स्त्रियांची मुक्तता’ या विषयावर विवेचन केले. सर्व उपस्थित गाव गाव शाखेच्या महिलांचा तसेच विविध क्षेत्रांमध्ये प्राविण्य मिळवलेल्या महिलांचा पुष्प देऊन व प्रमाणपत्र देऊन सत्कार करण्यात आला.
कार्यक्रमाच्या दुसऱ्या सत्रात लहान मुले व महिला यांनी सांस्कृतिक कार्यक्रम सादर केला त्यामध्ये नृत्य नाटिका गीत गायन असे कार्यक्रम सादर करण्यात आले अत्यंत उत्साहामध्ये सकाळी दहा ते सायंकाळी पाच वाजेपर्यंत स्त्री मुक्ती दिन साजरा करण्यात आला.
