
अहमदनगर जिल्हा प्रतिनिधि :- बबन हाके
शालेय शिक्षण समीती जिल्हा परिषद प्राथमिक शाळा ताजु येथे मा.मदारभाई शेख यांची कन्या कु.हुमेरा शेख हीचा वाढदिवस साजरा करण्यात आला.
जिल्हा परिषद शाळा ताजू या ठिकाणी शालेय शिक्षणसमीती यांच्या माध्यमातून विविध उपक्रम राबविले जातात त्यामध्ये विद्यार्थ्यांचा वाढदिवस साजरा करणे हा एक उपक्रम.
वाढदिवसा निमित्त शाळेस ४ खुर्ची, तसेच शाळेतील विद्यार्थ्यांना खाऊ वाटप करण्यात आला. या प्रसंगी सरपंच नानासाहेब पांडुळे, शालेय शि.स.अध्यक्ष बलराज दराडे, अण्णासाहेब दराडे , श्रीरंग बनसोडे,शब्बीर शेख,वाकले, एकनाथ दराडे, फिरोज शेख,अनिल मोरे, मोहद्दीन शेख, भारत माने, मछिंद्र दराडे, व पालक यांच्या उपस्थितीत हा कार्यक्रम पार पडला.
