
अहमदनगर – नुकत्याच झालेल्या शासकीय रेखाकला अर्थात इंटरमिजिएट चित्रकला ग्रेड परीक्षेचा निकाल जाहीर झाला. परीक्षेमध्ये शिवाजीराव नागवडे डेफोडील्स व कौशल्यादेवी नागवडे इंग्लिश मीडियम च्या विद्यार्थ्यांनी उज्वल यश संपादन केले.
दरवर्षीप्रमाणे याही वर्षी विद्यालयाने १००% यशाची परंपरा कायम ठेवत प्राविण्य मिळविले. एकूण ३९ विद्यार्थी परीक्षेसाठी प्रविष्ट झाले. पैकी ८ विद्यार्थी ए ग्रेड, १२ विद्यार्थी बी ग्रेड तर १९ विद्यार्थी सी ग्रेडमध्ये उत्तीर्ण झाले आहेत.
यशस्वी विद्यार्थी पुढील प्रमाणे –
ए ग्रेड – श्रद्धा वाळके, आसना जमादार, श्रुतिका कसरे, ईश्वरी साबळे, अपूर्वा शेळके, अंश ढवळे, श्रेयस पांडुळे, यश जाधव.
बी ग्रेड – शर्वरी वाघमारे, गायत्री भुजबळ, प्रांजल नवले, मयुरी गाडेकर, संस्कृती नागवडे, वैदेही बोरा, गार्गी गायकवाड, ओम गव्हाणे, ओम होले, सृष्टी कोथिंबीरे, आर्या घोडके, आदित्यराजे खोपडे.
सी ग्रेड – रोशन सुद्रिक, गार्गी सांगळे, प्रतीक्षा होले, मनहा शेख, वरद झगडे, अक्षरा भोस, आर्यन गोरे, प्रद्युम्न भोस, शिवतेज बडवे, ओंकार ननावरे, प्रज्वल ढवळे, ओम भोस, सार्थक केदारे, जय शेलार, चिन्मय ससाने, श्रेयश खेतमाळीस, आम्रपाली रणसिंग, गायत्री काळे, अंकिता गाडेकर.
सर्व विद्यार्थ्यांना विद्यालयाच्या कलाशिक्षिका सरिता सुपेकर यांचे मार्गदर्शन लाभले. या दैदीप्यमान कामगिरीबद्दल सर्व उत्तीर्ण विद्यार्थ्यांचे तुळजाभवानी सेवा प्रतिष्ठानचे अध्यक्ष राजेंद्र दादा नागवडे, विश्वस्त अनुराधाताई नागवडे, निरीक्षक एस.पी .गोलांडे, मुख्याध्यापिका नीतू दुलानी यांच्यासह शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी अभिनंदन केले आहे.

