
सिंधुदुर्ग प्रतिनिधी ; संजय भोसले.
महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ पुणे यांच्यामार्फत घेण्यात येणाऱ्या उच्च माध्यमिक प्रमाणपत्र परीक्षा (12 वी) मंगळवार पासून विविध परीक्षा केंद्रावर सुरळीत सुरू झाली. कणकवली तालूक्यातील कासार्डे केंद्रावर परीक्षा सुरळीत सुरू झाली असून पहिल्याच दिवशी केंद्रातील दिव्यांग विद्यार्थ्यांना पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले.
या परिक्षेसाठी कासार्डे, तळेरे, फणसगाव, मुटाट या उच्च माध्यमिक विद्यालयाचे कला, वाणिज्य व विज्ञान शाखेचे विद्यार्थी प्रविष्ठ झाले आहेत. या केंद्रातील दिव्यांग विद्यार्थ्यांना केंद्र संचालक अविनाश मांजरेकर व कासार्डे संस्था प्रतिनिधी सुभाष पाताडे यांच्या हस्ते पुष्पगुच्छ देऊन शुभेच्छा देण्यात आल्या. यावेळी कासार्डे विद्यालयाच्या मुख्याध्यापिका भाग्यश्री बिसुरे, फणसगाव विद्यालयाचे मुख्याध्यापक विजय पाटील, उप केंद्र संचालक अनिल नलावडे, पर्यवेक्षक सचिन शेट्ये, देवेंद्र देवरुखकर आदी उपस्थित होते.
