सिंधुदुर्ग प्रतिनिधी ; संजय भोसले

कासार्डे माध्यमिक विद्यालय माजी विद्यार्थी मित्रपरिवारातर्फे ओझरम शाळा नं. १ येथील मुलांच्या वसतिगृहासाठी किराणा सामान स्वरूपात मदत देण्यात आली. हा उपक्रम नुकताच पार पडला.कार्यक्रमाच्या सुरुवातीला मित्रपरिवाराचे सदस्य तसेच ओझरम शाळा नं. १ चे माजी विद्यार्थी श्री. बाबू राणे यांनी सर्व मान्यवरांचा परिचय करून दिला. त्यानंतर ग्रूपच्या वतीने श्री. अविनाश वाडये यांनी ग्रूपची आतापर्यंतची वाटचाल तसेच आतापर्यंत राबविलेल्या सामाजिक, शैक्षणिक उपक्रमांची सविस्तर माहिती दिली.वसतिगृह दक्षता कमिटीच्या वतीने श्री. विनायक रामचंद्र राणे आपल्या भाषणात कामावि मित्रपरिवाराचे आभार व्यक्त केले व ग्रूपच्या सामाजिक, शैक्षणिक कार्याची दखल घेत आगामी वाटचालीसाठी, उपक्रमासाठी शुभेच्छा दिल्या.दक्षता कमिटीचे अध्यक्ष श्री. लक्ष्मण दत्तात्रय राणे यांच्याकडे ग्रूपच्या सदस्यांनी किराणा सामान (अन्नधान्य इ.) सुपूर्द केले.या कार्यक्रमासाठी ग्रूपतर्फे श्री. अविनाश वाडये, श्री. बाबू राणे, शांताराम पारकर, गुरुनाथ नकाशे, नारायण पाताडे हे आपला अमूल्य वेळ देऊन उपस्थित होते.तसेच वसतिगृह दक्षता कमिटीचे अध्यक्ष श्री. लक्ष्मण राणे, दिनेश राणे, सदाशिव राणे (बाबू), विनायक राणे तसेच दक्षता कमिटीचे सदस्य हजर होते.ग्रूपमधील सर्वच सदस्यांचा खंबीर पाठिंबा, श्री. बाबू राणे यांचे योग्य नियोजन आणि मार्गदर्शन तसेच काही सदस्यांनी दिलेले अमूल्य असे वैयक्तिक योगदान यामुळेच हा उपक्रम यशस्वीरीत्या पार पडला. सर्वांचे मनापासून आभार आणि धन्यवाद!!
