संजय भोसले.

वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष आदरणीय बाळासाहेब आंबेडकर प्रदेशाध्यक्ष रेखाताई ठाकूर यांच्या आदेशाने संपूर्ण राज्यभर तीन डिसेंबर ते 16 डिसेंबर पर्यंत ईव्हीएम हटाव लोकशाही बचाव यासाठी स्वाक्षरी मोहीम घेण्याचा आदेश देण्यात आला होता. त्याचाच एक भाग म्हणून वंचित बहुजन आघाडी कोल्हापूर जिल्ह्याच्या वतीने आज राजश्री शाहू महाराज यांचे पुतळ्याला अभिवादन करून दसरा चौक येथे evm विरोधी स्वाक्षरी जनआंदोलन करणेत आले 3 डिसेंबर ते 16 डिसेंबर या कालावधीत कोल्हापूर जिल्ह्याच्या प्रत्येक गाव खेड्यातून ईव्हीएम हटाव च्या संदर्भात स्वाक्षरी घेऊन मोठी जनांदोलन उभारण्यात येणार असून जिल्ह्याच्या प्रत्येक पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी यासाठी एकजुटीने काम करण्याचा निर्धार व आवाहन जिल्हाध्यक्ष प्रमोद कदम यांनी केले.
