सिंधुदुर्ग प्रतिनिधी ; संजय भोसले

विद्यामंदिर माध्यामिक प्रशालेत इयत्ता दहावीच्या विद्यार्थ्यांना अभ्यास विषयक प्रबोधन व पालक सभा आयोजित करण्यात आली प्रथम सत्र परीक्षा व निकाल तसेच इयत्ता दहावीच्या सर्व विषयांचे परिक्षेच्या संदर्भात उपयुक्त माहितींचे मार्गदर्शन करण्यात आले तसेच पालकांनीही आपल्या पाल्यांच्या संदर्भात अभ्यासाच्या अनेक सूचना मांडून विचार व्यक्त केले या कार्यक्रमाचे प्रास्ताविक सौ संगीता साटम मॅडम यांनी करून पालकांचे स्वागत केले जेष्ठ शिक्षक श्री अच्युतराव वणवे सरांनी प्रशालेत इयत्ता दहावीच्या विद्यार्थ्यासाठी अभ्यास विषयक उपक्रमांची माहिती आणि अभ्यासिका या विषयी मार्गदर्शन करून आदर्श उत्तरपत्रिका विद्यार्थ्याकडून पालकांनी कशी सोडवून घ्यावी याचे मार्गदर्शन केले . प्रशालेच्या पर्यवेक्षिका सौ वृषाली जाधव मॅडम यांनी मराठी विषयाच्या अभ्यासाविषयी मार्गदर्शन केले प्रशालेचे मुख्याध्यापक श्री पी जे कांबळे सरांनी पालक आणि विद्यार्थी यांचा समन्वय साधून अभ्यासाचे महत्व व पालकांची भूमिका या विषयी मार्गदर्शन केले पालकांच्या शंकांचे निरसन करून माहिती विषद केली सौ वैभवी हरमलकर मॅडम यांनी कमीत वेळात अभ्यास कसा करावा यामध्ये पालकांची भूमिका कोणती असावी या विषयी मार्गदर्शन करून सर्वांचे आभार मानले या कार्यक्रमाला इयत्ता दहावीच्या विद्यार्थ्यांचे पालक बहुसंख्येने उपस्थित होते.

