पैठण प्रतिनिधी श्रीपत पवार.

लिंबगाव येथील शेतकरी श्री सदाशिव यांच्या गट नंबर 144 मध्ये दिनांक 15 रविवार रोजी पहाटे चार वाजता एका बिबट्याने गाईच्या वासरा वरती (कालवड ) हल्ला केला असता कालवड जागीच गतप्राण झाली लिंबगाव येथे अखंड हरिनाम सप्ताह चालू असल्यामुळे सदरील शेतकरी शेतात झोपण्यासाठी गेले नव्हते. त्यांनी सकाळी नऊच्या दरम्यान शेतात जाऊन पाहिले तर त्यांना हा प्रकार पाहायला मिळाला नंतर गावातील लोकांना फोन करून घटनेची माहिती दिली पोलीस पाटील यांनाही फोनवर माहिती देण्यात आली ते घटनास्थळी आले. वनविभागाच्या अधिकाऱ्याला फोन लावून कळविले नंतर वन विभागाचे वनाधिकारी श्री निकाळजे सह काही वनाधिकारी येऊन त्यांनी सदर घटनेचा पाहणी करून पंचनामा केला त्यांनी सदरील शेतकऱ्याला सांगितले की तुम्ही ऑनलाईन अर्ज करा नंतर तुम्हाला नुकसान भरपाई भेटून जाईल वनाधिकारी श्री निकाळजे यांनी उपस्थित शेतकऱ्यांना आव्हान केले की ,तुम्ही शेतात जाताना स्वतःच्या सुरक्षिततेसाठी हातात बॅटरी, काठ्या , कुऱ्हाड, कोयता, असावा मोबाईलचा मोठा आवाज ठेवत जा,वाघ दिसला तरी पळून जाण्याचा प्रयत्न करू नका किंवा खाली वाकू नका अशा परिस्थितीत तो तुमच्यावर हल्ला करू शकतो कधीही एकट्याने शेतात जाऊ नये सोबत एक तरी माणूस असावा संध्याकाळी पाचच्या नंतर तो बाहेर निघतो एकदा शिकार केली की तो पाच ते सहा दिवस काही खात नाही ज्या ठिकाणी शिकार केली त्याच ठिकाणी तो परत येण्याची शक्यता असते एका वेळेस तो पाच किलो मांस खाऊ शकतो वाघाची जर खूपच भीती वाटत असेल तर पोत्या मध्ये काही मिरच्या भरून ते पोत चेतुन द्याव पोत रात्रभर हळूहळू जळत राहील आणि वाघाला ठसका हा अजिबात सहन होत नाही त्यामुळे त्या कारणाने वाघ त्याठिकाणी येणार नाही अशी माहिती वनाधिकारी श्री निकाळजे यांनी दिली. याप्रसंगी लिबंगाव चे पोलीस पाटील शहादेव वावळ वन विभागाचे श्री निकाळजे सह काही कर्मचारी हजर होते तसेच दैनिक पुढारी चे पत्रकार भागवत खरग,तसेच दैनिक समताभूमी,शब्दभूमीचे पत्रकार श्रीपत पवार,शेतकरी सदाशिव नितळ, दत्तात्रय नितळ वसंत हिंगले, काशिनाथ हिंगले, मुकुंद पवार, संतोष पवार ,भगवान हिंगले ,दीपक नितळ, गणेश शेळके, प्रभाकर नितळ ,कल्याण नितळ, रामेश्वर नितळ, परमेश्वर नितळ इत्यादी हजर होते
