
सिंधुदुर्ग प्रतिनिधी ; संजय भोसले.
कणकवली येथील विद्यामंदिर माध्यमिक प्रशालेत वार्षिक क्रीडा महोत्सव उत्साहात पार पडला . इयत्ता पाचवी ते दहावी सर्व वर्गांच्या शालेय क्रीडा स्पर्धा उत्तम नियोजन करून घेण्यात आल्या शालेय जीवनात खेळांना अनन्य साधारण महत्त्व आहे प्रशालेतील विद्यार्थांचे विविध खेळ प्रकारानुसार संघ तयार करून वैयक्तीक व सांघिक स्पर्धा घेण्यात आल्या सर्व स्पर्धांचे नियोजन क्रीडा शिक्षक श्री अच्युतराव वणवे सर श्री सुदिन पेडणेकर सर यांनी केले . कब्बडी ‘ हॉलीबॉल ‘खो-खो ‘ गोळाफेक ‘भाला फेक ‘ थाळी फेक लांब उडी ‘ उंच उडी ‘ लंगडी इ क्रीडा प्रकार घेण्यात आल्या . मुख्याध्यापक श्री पिराजी कांबळे सरांनी क्रीडा महोत्सवाचे शानदार श्रीफळ वाढवून उद्घाटन केले आणि सर्व खेळाडूंना शुभेच्छा दिल्या . या वेळी पर्यवेक्षिका सौ वृषाली जाधव मॅडम व सर्व शिक्षक / शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते .
