
सोपान सासवडे
जिल्हा ग्रामीण प्रतिनिधी अहिल्यानगर.
विद्यार्थ्यांच्या आनंदाचे व सुप्तगुणांचे व्यासपीठ म्हणजे स्नेहसंमेलन होय. विद्यार्थांनी आपल्या अंगी असणारे गुण व्यासपीठावर व्यक्त केले पाहीजे असे प्रतिपादन संस्थेचे मुख्य कार्यकारी अधिकारी प्रा. लक्ष्मणराव बिटाळ यांनी केले. चापडगाव माध्यामिक व उच्च माध्यमिक विद्यालयात वार्षिक स्नेहसंमेलन कार्यक्रम संपन्न झाला प्रसंगी अध्यक्षस्था नाहून ते बोलत होते. कार्यक्रमप्रसंगी व्यासपीठावर प्राचार्य अरुण वावरे , पयवेक्षक लक्ष्मण गाडे , प्रा.अशोक आहेर , अशोक ढाकणे, शिवाजी तेलोरे, संजय पातकळ , विष्णू मुटकुळे , अण्णासाहेब गोरे, मंगल गोरे , प्रिया पातकळ , पार्वती पोपळे , जिजाबाई जाधव , शोभा मुटकुळे आदी मान्यवर उपस्थित होते. प्रा. लक्ष्मणराव बिटाळ पुढे म्हणाले की, मेहंदी , रांगोळी ,चित्रकला आदि कलेच्या माध्यमातून विद्यार्थ्यांनी समाजाला विशेष संदेश दिलेला आहे. रंगमंचावरील कलाकार हे तुमच्यातीलच आहे त्यांच्या गुणांना टाळयाच्या स्वरूपाने दाद दया. असे आवाहन त्यांनी केले . मान्यवरांच्या हस्ते मेहंदी , रांगोळी , चित्रकला प्रदर्शनाचे उद्धाटन झाले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्राचार्य अरुण वावरे सुत्रसंचलन सर्जेराव निकाळजे यांनी केले तर आभार प्रा. दादासाहेब ज्योतिक यांनी मानले. कार्यक्रम यशस्वीतेसाठी सर्व शिक्षक , शिक्षकेतर कर्मचारी वृंदांचे सहकार्य लाभले.
