

अहील्यानागर प्रतिनिधि :-
“सडक सुरक्षा जीवन रक्षा” या उक्तीप्रमाणे प्रादेशिक परिवहन कार्यालय अहील्यानगर व नागवडे इंग्लिश मीडियम स्कूल यांच्या संयुक्त विद्यमाने मार्गदर्शन शिबिर संपन्न झाले यावेळी श्री. कल्पेश सूर्यवंशी सहाय्यक मोटर वाहन निरीक्षक यांनी विद्यार्थ्यांना हेल्मेटचा वापर करणे, कार व बाईक वर मोबाईलचा वापर टाळणे, कार मध्ये बसल्यावर सीट बेल्ट लावणे, पायी चालताना रस्त्याच्या उजव्या बाजूने चालणे,वाहतूक नियमांचे पालन करणे जे विद्यार्थी बसने ये जा करतात अशा विद्यार्थ्यांना बस मध्ये बसताना उतरताना कोणती काळजी घ्यावी, नित्य जे काही अपघात होतात त्यावर मात कशी करता येईल अपघातातून वाचता कसे येईल त्यावर अगोदर माहिती करून घेणे व खबरदारी घेणे याबद्दल मार्गदर्शन केले. यावेळी सूत्रसंचालन प्रेरणा गुंड यांनी केले आभार प्रियांका नागवडे यांनी मानले.निरीक्षक एस. पी.गोलांडे, मुख्याध्यापिका नीतू दुलानी यांच्यासह शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.

