
पाथर्डी प्रतिनिधी वजीर शेख
आजच्या स्पर्धेच्या व व्यवहारीक युगात तरूणांना टिकायचे असेल व स्वत:ची प्रगती साधायची असेल तर पारंपरिक व पुस्तकी शिक्षणाबरोबर तरुणांनी कौशल्यभिमूख शिक्षणावर अधिक भर द्यावा जेणेकरून कमी कालावधीत रोजगार निर्मिती होईल असे प्रतिपादन राजळे यांनी केले,यावेळी ते पुढे म्हणाले की आज आपल्या सभोवताली खास करुन ग्रामीण भागात बेरोजगार तरुणांचे जथ्थे चे जथ्थे तयार होत आहेत, आजचे तरुण गावोगावी व चौका – चौकात केवळ राजकारण व धार्मिक मुद्दावर निरर्थक चर्चा करतांना दिसत आहेत, राजीव फाऊंडेशन आयोजित ‘सावित्री फातिमा शैक्षणिक शिष्यवृत्ती वितरण समारंभ व’ शिक्षा पे चर्चा’ या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानावरून राजळे बोलत होते,यावेळी माजी पोलीस महानिरीक्षक अब्दुर रहमान प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते, यावेळी अब्दुर रहमान म्हणाले की आजच्या तरुण मुलांनी भ्रष्ट व ढोंगी राजकारण्यांच्या मागे न लागता व धार्मिक प्रकारच्या मुद्यावर स्वतःला न गुतंवता कौशल्यभिमूख शिक्षणावर व आपल्या आवडीच्या विषयात रस असलेल्या क्षेत्रावर लक्ष केंद्रित करावे जेणेकरून अर्थाजणाबरोबरच आनंदी राहता येईल, यावेळी त्यांनी विविध राज्यांतील स्पर्धा परीक्षेतील उत्तीर्ण विद्यार्थ्यांची टक्के याबद्दल माहिती दिली,यावेळी त्यांनी स्पर्धा परीक्षेमधे किती व कसा अभ्यास करावा,या काळात शारीरिक व मानसिक आरोग्य कसे सांभाळावे, सामान्य ज्ञान अधिक प्रमाणात कसे आत्मसात करावे, पहिल्या-दुसर्या प्रयत्नात यश न मिळाल्यास खचून न जाता अधिक जोमाने पुन्हा प्रयत्न करावेत,विविध क्षेत्रातील सनदी अधिकारी व इतर तज्ञांचें वेळोवेळी मार्गदर्शन घ्यावे असे मौलीक मार्गदर्शन केले, यावेळी राजीव फाऊंडेशन तर्फे पाथर्डी तालुक्यातील इयत्ता आठवी पुढील गरीब व गरजू विद्यार्थ्यांना वार्षिक प्रत्येकी सहा हजार रुपये प्रमाणे सावित्री फातिमा शैक्षणिक शिष्यवृत्तींचे वाटप करण्यात आले,यावेळी दिगंबर गाडे, हुमायून अत्तार,योगेश रासने, प्रत्रकार राजेंद्र देवढे, पत्रकार राजेंद्र सावंत, पत्रकार वजीर शेख,महंमद शेख, निलेश पिसे,जावेदा जिंदगी, गणेश धनवडे, निहाल शेख सुनिल शिंदे,कॉंग्रेसचे पाथर्डी तालुकाध्यक्ष नासीर शेख, शेवगाव कॉग्रेसचे तालुकाध्यक्ष समीर काझी, डॉ. वारकड, ठकसेन तुपे, गोविंद तरटे, तुकाराम मरकड, शहरातील तरुण विद्यार्थी व त्यांचे पालक मोठय़ा संख्येने उपस्थित होते, यावेळी सुत्रसंचालन सुखदेव मर्दाने यांनी, प्रास्ताविक राजीव फाऊंडेशनचे अध्यक्ष सलीम शेख यांनी तर आभार प्रदर्शन अरविंद सोनटक्के यांनी केले.
