वीस वर्षानंतर जुन्या आठवणींना मिळाला उजाळा.

परभणी: श्रीमती रतनबाई चंद्रकांत सोनटक्के प्रशाला नवागड दहावी 2005 बॅच विस वर्षा नंतर एकत्र भेटले वर्गमित्र गेट टू गेदर चा निमित्ताने एक दिवसीय गेट टू गेदर कार्यक्रम आयोजित केला होता. जवळपास 40 वर्गमित्र एकत्र आले. नामदेव मुलगीर यांच्या बाबळी या ठिकाणी फार्महाऊस वर सकाळी चहा नाष्टा नंतर सर्वानी एकमेकाचा परिचय व सध्या काय यवसाय करतात याबद्दल माहिती दिली, दुपारी मस्त जेवणाचा आस्वाद घेतला व जुन्या गप्पा गोष्टी व आठवणीत रमले बालमित्र. या गेट टू गेदर साठी कृष्णा हेलसकर (मामा). निलेश भागवते,गंगाधर आनेराव, नामदेव मुलगीर,ज्ञानोबा माने,विठ्ठल मुलगीर, अंनता ठोळे, संदीप साधे,महेश महाजन, रुपेश देशमुख, विशाल जाठोठे,गजानन देशमुख,विशाल कोठेकर आदी नी परिश्रम घेतले.
