पुणे प्रतिनिधी
मा.मंत्री छगन भुजबळ पुणे येथे दौऱ्यावर असताना मा. विजय गिरमे यांची महात्मा फुले समता परीषदेच्या दौंड तालुका अध्यक्ष पदी नियुक्ती करण्यात आली. यावेळी छगनराव भुजबळ व अनिल लडकत,विभागीय अध्यक्ष प्रितेश गवळी यांनी विजय गिरमे यांचा सत्कार करून, त्यांना नियुक्ती पत्र दिले.आपल्या गेल्या अनेक वर्षांतील सामाजिक कार्यातील उत्कृष्ट कामगीरी अतिशय उल्लेखनीय आहे. आपल्या दूरदर्शी नेतृत्वाखाली समता परिषदेच्या मार्फत तालुका व जिल्हाभर निश्चितच भक्कमपणे विस्तारेल. पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा! या वेळी प्रदेश अध्यक्षा मंजिरी धाडगे,समता परिषदेचे अविनाश चौरे, विभागीय अध्यक्ष प्रितेश गवळी, पुणे जिल्हा अध्यक्ष अनिल लडकत, जिल्हा प्रसिद्धी प्रमुख किशोर वचकल,समता परिषदेच्या सपना माळी,प्रसाद नाळे ,पुणे शहर कार्याध्यक्ष सागर दरवडे ,हनुमंत यादव, ओबीसींचे युवा नेते अनिकेत भागवत,क्रांतीसुर्य न्यूज चे संपादक प्रविण बोचरे, कोथरुड अध्यक्ष प्रदिप हुमे, विलास यचकल,अलंकार खेडेकर,समता परिषदेचे प्रदिप बनसोडे, सोलापूर समता परिषदेचे गणेश माळी, यांच्यासह समता परिषदचे अधिकारी व पदाधिकारी उपस्थित होते.
